नवी मुंबई महानगरपालिकेने पावसाळ्याआधीच्या नालेसफाई मोहिमेत गटारे साफ झाली असली तरी गटारांमधील गाळ मात्र रस्त्यावरच पडून आहे. आठ दिवसांपासून काही ठिकाणी काढलेला गाळ उचलला गेला नसल्याने परिसरात आरोग्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. रविवारी रात्री काही ठिकाणी पावसाच्या सरी आल्याने हा गाळ पुन्हा पाण्यासोबत पुन्हा गटारांमध्ये वाहून जाण्याची शक्यता आहे.
शहरातील अंतर्गत रस्ते आणि मुख्य मार्गावरील गटारांतील सफाईची कामे हाती घेतली आहेत. गटारांतील गाळ साचून राहिल्याने पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. नोड क्रमांक आठमध्ये गटारांमधील गाळ बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
विशेष हा गाळ वेळीच इतरत्र न हलवता तो पालिकेचे सफाई कर्मचारी तो हा रस्त्यावरच टाकत आहेत; मात्र अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने तो पुन्हा ओला होऊन गटारात जाण्याची शक्यता आहे. सफाई कर्मचारी गटारांमधून काढलेला गाळ काही दिवस सुकण्याची वाट बघतात. त्यानंतर तो कचरागाडीत टाकला जातो. परंतु ऐरोली, कोपरखरणे आणि वाशी परिसरातील गाळ सुकल्यानंतरही उचलण्यात आलेला नाही. त्यामुळे पदपथांवर गाळ साचून आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th May 2016 रोजी प्रकाशित
वाशीमध्ये पदपथावर गटारातील गाळ
शहरातील अंतर्गत रस्ते आणि मुख्य मार्गावरील गटारांतील सफाईची कामे हाती घेतली आहेत.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 24-05-2016 at 04:49 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sewage sludge lying on footpath in vashi