scorecardresearch

“जादूटोणा करणे बंद करा, अन्यथा…”, राष्ट्रवादीचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

महागाई आणि बेरोजगारी विरोधात एल्गार पुकारत आज राष्ट्रवादी काँग्रेसची जनजागर यात्रा नवी मुंबईत पोहोचली.

“जादूटोणा करणे बंद करा, अन्यथा…”, राष्ट्रवादीचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल
एनसीपी नेत्या विद्या चव्हाणांचा शिंदे व फडणवीसांवर हल्लाबोल(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनजागर यात्रेला जल्लोषात सुरूवात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर आमदार कामाख्या मंदीरात दर्शनास गेले होते याचा संदर्भ घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला अध्यक्ष विद्या चव्हाण यांनी शिंदे व फडणवीस यांचे नाव न घेता जादूटोणा बंद करण्याचे आवाहन केले आहे. महागाई आणि बेरोजगारी विरोधात एल्गार पुकारत आज राष्ट्रवादी काँग्रेसची जनजागर यात्रा नवी मुंबईत पोहोचली.

VIDEO :

महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बेलापूर मधून या जनजागर यात्रेला मोठ्या जल्लोषात सुरुवात करण्यात आलीय. महागाई व बेरोजगारी विषयी हे सरकार एकही शब्द काढत नसून या विषयांवरून नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी धर्मवीर सारख्या विषयांवरून राजकारण केलं जातंय अशी टीका महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी केली. यावेळी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत निरिक्षक प्रशांत पाटील, तालुकाध्यक्ष सुधीर कोळी, आदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शोकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-01-2023 at 16:29 IST

संबंधित बातम्या