नवी मुंबई : नवी मुंबई जिल्हा न्यायालयात सुकून प्रकल्पाचे उद्धाटन आज करण्यात आले. या सुकून प्रकल्पामुळे कायद्याच्या कक्षेत राहून कौटुंबिक खटले दोन्ही पक्षांच्या सामंजस्याने मिटवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विशेष म्हणजे हि सेवा पूर्ण मोफत आहे. या प्रकल्प  उद्घाटन प्रसंगी  न्यायाधीश रचना तेहरा आणि प्रकल्प प्रमुख डॉ. अपर्णा जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. 

अनेकदा क्षुल्लक वाद, समोरच्या व्यक्तीला नामोहरम करण्याची जिद्द , अपमानाचा बदला, अशा अनेक कारणांनी न्यायालयात धाव घेतली जाते. यात सर्वाधिक पती पत्नीतील वादाचा समावेश होतो. हे कौटुंबिक वाद न्यायालयात येण्यापूर्वी आप आपसातच मिटावे व वादाचे रूपांतर संवादात व्हावे यासाठी कौटुंबिक न्यायालय बेलापूर याठिकाणी सुकून प्रकल्प सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. कौटुंबिक वाद अनेकदा “इगो” भोवती फिरणारे असतात. त्यामुळे दोन्ही पक्षांचे ऐकून घेणे त्यांचे मन मोकळे होऊ देणे, न्यायालयीन लढाईत होणारे परिमाम आदींची माहिती देत सामंजस्याने वाद मिटविण्याचे प्रयत्न या द्वारे केले जाणार आहेत. यासाठी केवळ वकीलच नव्हे तर  डॉक्टर, मनसोपचार तज्ञ् यांचा समावेश असणार आहे. सध्या  न्यायालयात नवी मुंबईतील एक हजार ८९७  केसेस असून हा वाद या सेंटर च्या माध्यमातून सुटावा हा आमचा उद्देश असल्याचे सेंटर च्या प्रमुख डॉ. अपर्णा जोशी यांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खटला न्यायालयात दाखल झाल्यावर प्रत्यक्ष बोर्डावर येण्यापूर्वी आणि आल्यावरही सुकून द्वारे वाद मिटविण्याचे दरवाजे खुले असणार आहेत. कौटुंबिक वाद अनेकदा विकोपाला पोहचल्यावर त्याला उत्तर न सापडल्याने न्यायालयात येतात. या वादाचा परिमाण केवळ जोडप्यावर होत नसतो तर दोन्ही कुटुंब मुले भरडले जातात. त्याला सुकून प्रकल्प उत्तम पर्याय आहे. मन मोकळे होईल एवढे बोलू शकता कितीही वेळ घेऊ शकतात. त्याला कुठे तरी समाधान मिळावे हाच या प्रकल्पाचा उद्देश्य आहे. अशी माहिती न्यायमूर्ती श्रीमती रेवती मोहिते – डेरे यांनी दिली.या उद्धाटन प्रसंगी जिल्हा न्यायाधीश  एम आर मांडवडीकर बार कौन्सिल अध्यक्ष ऍड. सुनील मोकल, तसेच बार काउन्सिलचे अनेक सदस्य यावेळी उपस्थित होते.