उरण : येथील बोकडविरा गावातील एकट्या रहाणाऱ्या ललिता कृष्णकांत ठाकूर (६४) या विधवा महिलेची मंगळवारी हत्या झाली होती. ही हत्या तिच्या दागिन्यांसाठी झाली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी अमोल सर्जेराव शेलार (३०) या आरोपीला उरण पोलिसांनी बुधवारी अहमद नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव या त्याच्या मूळ गावातून अटक केली आहे. यातील आरोपी निष्पन्न झाला आहे. मृत महिलेच्या अंगावरील दागिने आरोपीने पुण्यातील शिरूर येथील एका सराफा कडे गहाण ठेवले असल्याची कबूली दिली आहे.

हेही वाचा- रायगडात अल्पवयीन मुली पळून जाण्याचे प्रमाण वाढले

बोकडविरा येथील ललिता ठाकूर यांच्या घरातील खोलीत राहणाऱ्या भाडेकरू वर पोलिसांचा संशय होता. मंगळवारी सकाळी महिला आपल्या घराच्या शेजारीच काम करीत असलेल्या शाळेच्या किल्ल्या घेण्यासाठी शाळेतील कर्मचाऱ्यांनी चौकशी केली. त्यावेळी तिच्या घराच्या दाराला कुलूप होते. मात्र त्यानंतर ही ती न सापडल्याने तिचा तपास सुरू होता. त्याचवेळी महिलेचा भाडेकरूच्या खोलीच्या खिडकीतून महिला हात पाय व तोंड बांधलेले असलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.

हेही वाचा- नवी मुंबई : कोपरखैरणे रेल्वे स्थानक परिसरात कचऱ्याचे साम्राज्य

पोलिसांच्या तपासात भाडेकरुच्या खोलीत वृद्ध महिला मृतावस्थेत आढळून आली होती. भाडेकरू फरार झाल्याने उरण पोलिसांनी तपास सुरू करून त्याचा शोध घेतला. उरण पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी घेतली. पोलीस अधिकारी विजय पवार अधिक तपास करीत असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.