नवी मुंबई: नवी मुंबईतील कोपरी गावातील गणेश मंदिरात चोरी झाली असून चोराने दानपेटी चोरी केलीच शिवाय चांदीच्या पादुकासुद्धा चोरी केल्या. याबाबत एपीएमसी पोलीस ठाण्यात अनोळखी  व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा – उरण परिसरात सुक्या मासळीच्या दरांत वाढ

हेही वाचा – पनवेल : तळोजातील वायू गुणवत्ता निर्देशांकावर मोजमाप व्यवस्थित होत नसल्याची रहिवाशांची तक्रार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोपरी गावात एक गणेश मंदिर असून सदर मंदिरात दीपक गोस्वामी हे पूजा-अर्चा तसेच मंदिर व्यवस्था पाहतात. मंदिर सकाळी साडेसहा ते दुपारी तीन आणि संध्यकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत दर्शनासाठी उघडे असते, तर रात्री गाभारा कुलूप बंद करून पुजारी दीपक गोस्वामी सभामंडपात झोपतात. अशाच प्रकारे १७ तारखेला मंदिर गाभारा बंद करून ते सभामंडपात झोपले. मात्र १८ तारखेला सकाळी जेव्हा उठून ते आपले नेहमीचे काम सुरु करण्यासाठी म्हणून गाभाऱ्याकडे गेले तेव्हा गाभाऱ्याचे कुलूप तोडलेले आढळून आले, तसेच दानपेटी आणि चांदीच्या पादुका असे एकूण ३२ हजार रुपयांचा ऐवज चोराने चोरी केल्याचे समोर आले. याबाबत एपीएमसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.