मुंबई व नवी मुंबई जवळच वाढत शहर म्हणून गणना होत असलेल्या उरण तालुक्यात खेळाडूंना खेळण्यासाठी मैदान नसल्याने उरणच्या खेळाडूंवर कुणी मैदान देता का मैदान म्हणण्याची वेळ आली आहे. राष्ट्रीय पातळीवर प्रो कबड्डी, कुस्ती,मॅरोथॉन, भाला फेक यासारख्या अनेक स्पर्धात उरणमधील तरुण खेळाडूंना यश मिळवले आहे. मात्र, या खेळाडूंना सराव करण्यासाठी मैदान नाही. मैदान नसतानाही मॅरेथॉन स्पर्धेतून उरणमधील काही धावपटूंना नोकरी ही मिळालेली आहे. खेळाच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराची संधी असतांना उरणमध्ये खेळाचे मैदान उपलब्ध नाही. याचा फटका अनेक होतकरू खेळाडूंना बसत आहे.
हेही वाचा- नवी मुंबई : दिवाळीच्या तोंडावर सुका मेवा महागला ; पिस्ता, खारीक, मनुका वधारला
राज्य शासनाने तालुका तेथे क्रीडांगण अशी योजना जाहीर केली आहे. या नवीन योजनेतून ५ कोटींचा निधी शासन देणार आहे, अशी माहिती क्रीडा विभागाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा- उरण – पनवेल मार्गावरील खडखडाट कधी बंद होणार?
उरणच्या खेळाडूंना आठ वर्षापासून प्रतीक्षा
उरण तालुक्यासाठी क्रीडांगण मंजूर होऊन जवळपास दहा वर्षे झाली आहेत. त्यासाठी सिडकोच्या माध्यमातून द्रोणागिरी नोड मधील सेक्टर ५२ मध्ये भूखंड देण्याचे मान्य करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता उरण मधील तालुका क्रीडांगणासाठी सिडको कडून भूखंड मिळणार आहे. त्याचा करार झालेला नाही. तो झाल्यानंतर क्रीडांगणासाठी निधी मंजूर करून कामाला सुरुवात केली जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.