लोकसत्ता टीम
पनवेल: कामोठे वसाहतीमध्ये मागील दोन दिवसांपासून डांबरी रस्त्याला तीन वेगवेगळ्या ठिकाणी मोठे भगदाड पडले आहे. अचानक रस्ता खचला या भीतीने रहिवाशांमध्ये भिती निर्माण झाली. या सर्व परिस्थिती त्या भगदाडांमध्ये पावसाचे पाणी साचल्यावर इतर रस्ता खचू नये म्हणून पनवेल महापालिका हे साचलेले पाणी मोटारपंपाच्या साह्याने उपसत आहेत. रहिवाशी जेथे भगदाड पडले तेथे महानगर गॅस वाहिनीचे काम झाले होते, त्यामुळे या कंपनीविरोधात रहिवाशी संताप व्यक्त करत आहेत.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
कामोठे वसाहतीमधील पोलीस ठाण्याच्या इमारतीशेजारी मोठे भगदाड रस्त्याकडेला पडले. अचानक कामोठे वसाहतीची जमीन खचायला लागली असा संदेश समाजमाध्यमांवर पसरायला सुरुवात झाली. असे खड्डे एकाच ठिकाणी नव्हेतर सेक्टर ३४ येथील वृंदावन सोसायटी आणि पंचवटी सोसायटी या तीन ठिकाणी पडल्याने रहिवाशांमध्ये घबराट पसरली.