नवीन वर्षाच्या आगमनाचे कमडाऊन सुरु झाले असून आठवड्याची प्रभात नवीन वर्षाने होत आहे. ३१ ला शनिवार आणि १ जानेवारीला सुट्टी असल्याने मनसोक्त आनंदाचे उधाण येण्याची शक्यता पाहता पोलीस बंदोबस्तात नेहमीपेक्षा वाढ करण्यात येत आहे. खास करून पनेवल परिसरातील गावा दरम्यान शेत घरे, डोंगरावरील जागा, जंगल परिसर आणि धरण परिसरातील गारव्यात मद्य पार्ट्या होण्याच्या शक्यतेने त्या वाटेवरही पोलीस बंदोबस्त शनिवार पासून लावण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- नवी मुंबई : नववर्षाच्या स्वागताला व सरत्या वर्षाच्या निरोपाला वाहतूक पोलीस रात्रभर रस्त्यावरच

दोन वर्षांचा करोना कालावधी सरला त्यानंतरही आलेल्या नव वर्षाला काहीशी बंधने होती. यंदा मात्र बंधनमुक्त थर्टी फस्ट साजरा करण्यासाठी सर्वच स्तरातील नागरिकत उत्साह वाहत आहे. मोठ मोठी हॉटेल्स ते साधी हॉटेल्स , पब, बार, रिसोर्ट जवळपास सर्वच बुक झालेले आहे. अशा वेळी चायनीज आणि नीचे धरती उपर आकाश अशा पद्धतीचाही आनंद लुटण्याचे मनसुबे रचली जात आहेत. पनवेल परिसरात नीरा, मालडूंगे, क्रोपोली, गाढेश्वर आणि थोडे पुढे गेल्यास मोरबे धरण आहे. सध्या त्या मानाने गारवा असल्याने या परिसरातील बोचर्या थंडीत चिअर्स करीत नववर्षाचे स्वागत केले जाऊ शकते मात्र उघड्यावर मद्य पिण्यास मनाई असल्याने पोलिसांचे अशा पार्टीवर नजर ठेवणे आव्हान ठरणार आहे. या शिवाय या पूर्ण परिसरात खारघर हिल सह पनवेल उरण रस्ता नेरळ, रसायनी सुकापूर या मार्गावर जंगलप्रमाणे झाडी असल्याने अशा ठिकाणीही पार्ट्यावर पोलिसांना लक्ष ठेवावे लागणार आहे. मद्याचा अंमल  झाल्या नंतर अघटीत काही होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

हेही वाचा- नवी मुंबईत करोनाबाधित रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, महापालिका सतर्क

कोपर्ली, चिरनेर, दिघोडे, पेशवी, सुकापूर परिसरात सलमान खान सह अनेक बडी आसामी तसेच राजकीय पुढार्यांची शेतघरे आहेत या व्हीआयपी  ठिकाणी होणारी गर्दी पाहता पोलिसांचे विशेष लक्ष व बंदोबस्त आहे. यासाठी शेतघरे मालकांची बैठक बुधावारी घेण्यात आली होती मात्र त्यात एकही शेतघर असलेला एकही सेलेब्रेटी वा राजकीय नेत्याने उपस्थिती लावली नाही.

गेल्या काही वर्षापासून हेराँईन, एम डी, आदी अंमली पदार्थाच्या अनेक कारवाई परिसरात झाल्या असल्या तरी हे पदार्थ या ठिकाणी सापडले म्हणजे त्याचे ग्राहक असणार. तसेच अशा प्रसंगी रेव्ह पार्ट्याची शक्यता ग्रहीत धरता अंमली पदार्थ प्रकरणी मदत करणाऱ्या खबऱ्यांना सतर्क करण्यात आले आहे.

हेही वाचा- नवी मुंबई: दोनवेळा सरकारी अधिकाऱ्यांसमोर केली चोरी; अखेर पोलिसांनी ‘अशी’ केली अटक

पंकज दहाने (पोलीस .उपायुक्त परिमंडळ दोन) शेतघरे, डोंगर आणि वन परिसराला जाणारी रस्ते बंद ठेवण्यात आली आहेत. खारघर हिलवर आदिवासी व्यतरिक्त कोणाची घरे हॉटेल्स नसल्याने त्याही ठिकाणी अन्य लोकांना जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे. अमलीपदार्थ पदार्थ प्रकरणी पुरेशी सतर्कता ठेवण्यात आलेली आहे. नागरिकांनी कायद्याच्या चौकटीत राहून निर्धोक नवंवर्षाचे स्वागत करावे मात्र कायदा हातात घेतला तर नवीन वर्षाची पहाट कोठडीत होईल.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tight security by navi mumbai police during the new year celebration on the farm hills forest area and dam area dpj
First published on: 29-12-2022 at 15:49 IST