उरणची संरक्षण भिंत असलेल्या द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याची माती काढून तो पोखरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे, करंजा व चाणजे परिसरातील हजारो नागरिकांच्या, तसेच उरणच्या पर्यावरण, तसेच रामायणातील पौराणिक संदर्भ असलेल्या द्रोणागिरीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा डोंगर वाचविण्यासाठी ग्रामस्थांनी थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच साकडे घातले आहे.

उरणमधील विकासाच्या कामासाठी द्रोणागिरी डोंगराच्या तिन्ही बाजूने (एका बाजूने ओएनजीसी प्रकल्प असल्याने ते वगळता) पायथ्याची माती काढली जात असून, माती वाहून नेणारे डंपर उरण करंजा या रस्त्यावरून जात आहे, त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. तर रस्त्यांवर पसरलेल्या मातीवर पाणी टाकल्याने झालेल्या चिखलामुळे वाहने फसू लागली आहेत. याच परिसरात काही पावलांवरच करंजा हायस्कूल आहे. याचा फटका येथील विद्यार्थ्यांनाही बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे, करंजा परिसरातील नागरीकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा – नवी मुंबईत बहुचर्चित सायकल ट्रॅक वादात ! ६० झाडे तोडल्याप्रकरणी बेलापूरच्या सहाय्यक आयुक्तांनी नेरुळ उपअभियंत्याला बजावली नोटीस 

उरणच्या करंजा परिसरातील द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याचे मातीसाठी उत्खनन सुरू झाले आहे. ही माती वाहून नेणारे डंपर या रहदारीच्या रस्त्यावरून ये-जा करीत आहेत. आधीच अरुंद असलेल्या या रस्त्यांवर डंपरसह इतर वाहनांचीही ये जा होत असल्याने कोंडी होऊ लागली आहे. द्रोणागिरी ऐतिहासिक व महत्वाचा डोंगर असून याच डोंगरामुळे उरण तालुक्याचे अरबी समुद्रापासून संरक्षण होत आहे. तर, डोंगराच्या कुशीत देशातील सर्वात मोठा व सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा ओएनजीसी तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे. त्यामुळे, द्रोणागिरी डोंगराच्या संरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

२०१५ मध्ये माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जनजागरण करून द्रोणागिरी डोंगराचे पोखरण थांबविण्यात आले होते. तर, करंजा येथील नागरिकांनीही आंदोलन केले होते. मात्र, पुन्हा एकदा डोंगराच्या पायथ्याशी उत्खनन सुरू आहे. या डोंगराच्या पोखरणीमुळे डोंगराला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच, डोंगराच्या पायथ्याला उभ्या राहिलेल्या हजारो घरांच्या वसाहतीलाही पावसाळ्यात दरडीचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – नवी मुंबई : स्वच्छता अभियानाच्या जाहीरातबाजीचे दर अवाजवी ? शहरातील फ्लेक्सचे दर २० रुपये तर पालिकेच्या जाहीरातीसाठी ७९.३५ रुपये दर.

स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

द्रोणागिरी बचावच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी स्थानिक प्रशासनाकडे मागणी केली, सूचना केल्या, मात्र रॉयल्टी भरली आहे, असे उत्तर दिल्याने अखेर ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुखमंत्र्यांना साकडे घातले आहे.