नवी मुंबई – कायमस्वरुपी वर्दळीच्या असणाऱ्या मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर आज रविवारी कळंबोली जवळ पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर यशवंतराव चव्हाण मार्गाचा नामफलक लावण्यात येणार असल्याने कळंबोली येथून पुण्याकडे जाणारी वाहतूक वळवण्यात येणार असल्याची माहिती कळंबोली वाहतूक शाखेचे अधिकारी एन. व्ही. विश्वकार यांनी लोकसत्ताला दिली.

मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर नामफलक लावण्यात येणार आहे. त्यामुळे, पुण्याकडे जाणारी वाहतूक ही कळंबोली गेट नंबर ५ येथून देवांश हॉटेल, स्टील मार्केट येथून पुन्हा पुण्याकडे जाणाऱ्या महामार्गावर येणार आहे. हे अंतर ५०० मीटर असणार आहे, त्यामुळे कमी वेळातच वाहन चालकांना पुन्हा एक्सप्रेस मार्गावर येता येणार असल्याने वाहतूक कोंडी होणार नसून, याबाबत योग्य नियोजन केल्याची माहिती नवी मुंबई वाहतूक उपायुक्त तिरुपती काकडे यांनी लोकसत्ताला दिली.

हेही वाचा – शालेय विद्यार्थ्यांकरिता नवी मुंबई महापालिकेचा ‘वेस्ट टू बेस्ट’ उपक्रम

हेही वाचा – शेती नष्ट होत असलेल्या उरणमध्ये एका गुंठ्यांत ९१ किलो भाताचे उत्पादन, चिरनेरच्या शेतकऱ्याचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुपारी बारानंतर हे काम केव्हाही सुरू करण्यात येणार आहे. परंतु, कोणतीही वाहतूक कोंडी होणार नाही याची खबरदारी वाहतूक विभागाने घेतली आहे. दोन तास या कामाला लागण्याची शक्यता आहे. परंतु, पुण्याकडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात येणार नसून, फक्त वाहतूक वळविण्यात येणार आहे. त्यामुळे, नागरिकांनी व वाहन चालकांनी योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन नवी मुंबई वाहतूक विभागामार्फत करण्यात आले आहे.