सर्वात जास्त ताण तुर्भे वाहतूक पोलिसांना आहे.मात्र सध्या हे पोलीस ठाण्याचा पूर्ण परिसर खड्डे,चिखल, कचरा, आणि दुर्गधी युक्त झाला आहे. मात्र याकडे प्रशासन गांभीर्याने पाहत नसून पोलिसांनीच पोलीस ठाणे परिसरात खडी टाकून खड्डे बुझावाण्याचा प्रयत्न केला आहे. एक तर वाहतूक सुरळीत करण्याचा ताण त्यात असे रोगट वातावरणात काम करावे लागते त्यात वाहतूक सुरळीत करण्यास भर पावसात एकदा तरी भिजले जाते. अशी व्यथा अनेक पोलिसांनी मांडली.

नवी मुंबईत सर्वाधिक ताण असलेल्या वाहतूक पोलीस पैकी तुर्भे वाहतूक पोलीस ठाणे आहे. ठाणे बेलापूर कोपरखैरणे ते शिरवणे आणि शीव पनवेल मार्गावर सानपाडा ते शिरवणे हे दोन महामार्ग तसेच तुर्भे अंतर्गत भाग या शिवाय रात्रभर एमआयडीसीतील जड अवजड वाहतूक नियंत्रण  एवढा मोठा व्याप तुर्भे पोलिसांवर आहे.हे सर्व नियंत्रण करण्यासाठी वाहतूक पोलीस ठाण्यास स्वतःची जागाही नसून तुर्भे उड्डाणपुलाखाली बीट चौकी प्रमाणे कार्यालय आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर कायम खड्डे बुझावाण्याचे काम सुरु असल्याने पोलिसांना दिवस रात्र काम करावे लागते. अशात कार्यालय परिसर निदान प्रसन्न असावा अशी अपेक्षा या पोलिसांची आहे. मात्र तुर्भे वाहतूक नियंत्रण कार्यालय परिसरात पूर्ण रोगट वातावरण असून जागोजागी खड्डे चिखल पसरला आहे. वाहतूक नियंत्रण करताना वाहनांची घरघर ऐकावी लागतेच शिवाय कार्यालयात बसल्यावरही उड्डाणपुलावरून आणि नजरेच्या टप्प्यात असलेल्या महामार्गावरून जाणार्या गाड्यांचे आवाज रात्री जड अवजड वाहनांचे कर्णकर्कश्य हॉर्नच्या आवाजात काम करावे लागते.

हेही वाचा : महामार्ग पोलीस अधिका-यांच्या बदलीत लाखोंची उलाढाल

हा आमच्या कामाचा भाग आहे आम्ही त्याची मानसिक तयारी आमची असते मात्र कार्यालय परिसरातील घाण चिखल खड्डे या बाबत तरी समन्धित प्रशासनाने दखल घ्यावी अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे.उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात जागा असल्याने तुर्भे पोलीस ठाणे सह इतर काही पोलीस ठाणे अंतर्गत घडलेल्या अपघातातील वाहने वा जप्त केलेली दोनशेपेक्षा अधिक वाहने ठेवण्यात आली असून यात दुचाकी, रिक्षा ट्रक, चारचाकी अशा सर्वच वाहनांचा समावेश आहे.वाहने ठेवलेल्या जागेतील साफसफाई होत नसल्याने व पावसाचे पाणी साठल्याने प्रचंड डासांची पैदास होते. मनपा आरोग्य विभागही फवारणी करते मात्र तोंड देखली. त्यामुळे एक मिनिटही या ठिकाणी उभा राहता येत नाही. याच ठिकाणी दंड वसुली केंद्र असल्याने दंड भरण्यास येणाऱ्या वाहन चालकांना कार्यालय बाहेर रांगेत पावसाच्या पाण्यात उभे राहावे लागते.

हेही वाचा : नवी मुंबईत पाणीचोरीला बसणार पायबंद ; मूळ गावठाण , झोपडपट्टीधारक येणार पाणीमीटरच्या कक्षेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यांनाही या डासांचा मनस्ताप सहन करावा लागतोष शिवाय हिवताप वा तत्सम डासांच्या मुळे होणार्या रोगांची भीती असते. याच कारणांनी या कार्यालयात कायमच डासांना पळवून लावणारे साधने वापरली जातात.त्यामुळे कर्तव्य बजावताना सध्या सर्वाधिक त्रास या रोगट वातावरणाचा होती शरीरावाही आणि मनावरही अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.या बाबत  मनपा अभियांत्रिकी विभागाला विचारणा केली असता, त्यांनी सदर भाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्याचे सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाला विचारणा केली असता त्यांनी सुरवातीला मनपा कडे अंगुली निर्देश केला. मात्र न.मू. मनपाने त्यांना भाग नाही अशी माहिती दिल्याचे सांगितल्यावर चौकशी पाहणी करून योग्य ती कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले.