नवी मुंबई : बेकायदा राहणाऱ्या विदेशी नागरिकांवर पोलिसांनी कारवाई सत्र सुरू केले असून नेरुळ पोलिसांनी दोन बांगलादेशी नागरिकांना अटक केले आहे. हे दोघेही कुठलीही परवानगी न घेता भारतात आठ वर्षांपासून राहत असल्याचे समोर आले आहे. मोफीस मन्सूर शेख आणि विजयालक्ष्मी दिनेशकुमार राव असे कारवाई झालेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत.
हेही वाचा – जुने आले खातेय जादा भाव, घाऊकमध्ये जुने आले २०० पार तर नवीन आले ७५ रुपयांवर
हेही वाचा – सीबीआय चौकशीला कंटाळून सीमाशुल्क अधिकाऱ्याची आत्महत्या
नेरुळ गावातील भास्कर भोपी यांच्या इमारतीमध्ये बांगलादेशी नागरिक राहत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. या माहितीची त्यांनी नेमून दिलेल्या पथकाने शहानिशा केली. इमारती तपासणी केली असता चौथ्या माळ्यावर आरोपी मिळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता ते भारतीय नागरिक असल्याचा कुठलाही पुरावा त्यांना सादर करता आला नाही. त्यांना पोलीस ठाण्यात नेल्यावर केलेल्या चौकशीत ते सात ते आठ वर्षांपासून याच ठिकाणी राहत होते. तसेच त्यांनी व्हिसा पारपत्राशिवाय भारतात प्रवेश केल्याचे मान्य केले आहे. दोघांवरही पारपत्र कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांनी दिली.