नवी मुंबई: नवी मुंबई उर्वरित शिवसेनेला सोमवारी मोठे खिंडार पडले आहे. १४० प्रमुख पदाधिकारी तसेच सक्रिय कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्याने शिंदे शिवसेनेची ताकद वाढली आहे, असे प्रतिपादन शिवेसना शिंदे गटाचे नेते प्रमुख नरेश म्हस्के यांनी केले. तर ठाणे लोकसभेचा पुढील खासदार शिवसेनेचाच असणार असा विश्वास उपनेते विजय नाहटा यांनी व्यक्त केला.

नवी मुंबई उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे शेकडो कार्यकर्ते व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सेनेला जय महाराष्ट्र करीत शिंदे गटात प्रवेश केला. तसेच वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई अध्यक्ष शिंदे गटात आले आहे.

हेही वाचा… नवी मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाला खिंडार पडणार… 

शिवसेना ठाकरे गटात कशी घुसमट होते याचा अनुभव सर्वांनी घेतला आहे. शिवसेना बदललेली नाही तर केवळ नेतृत्व बदलले आहे. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शिवसेनेत आलेल्या अनेकांना पदेही दिली आहेत. जुने-नवे असा वाद होऊ न देण्यासाठी योग्य ती काळजी घेतली जात आहे, असे नाहटा यांनी सांगितले. घुसमट सहन न झाल्याने उ.बा.ठा सेनेला ‘जय महाराष्ट्र’ केल्याचे मनोगत शिंदे गटात आलेल्या नेत्यांनी व्यक्त केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रमुख पदाधिकारी

शहर प्रमुख विजय माने, माजी विरोधीपक्ष नेते दिलीप घोडेकर उपजिल्हा प्रमुख मिलिंद सूर्यराव, माजी नगरसेवक मनोहर जोशी असे एकूण १४० तर वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई अध्यक्ष भूषण कासार यांनीही शिवसेना शिंदे गटात प्रवाह केला.