उरण : आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्ताने सोमवारी दोन दिवस अगोदरच उरण नगरपरिषदेच्या जलरणतलावात पाण्याखाली कुलकर्णी दाम्पत्याने १३ फूट खोल तलावात २२ मिनिटांत वेगवेगळ्या प्रकारची १२ आसने केली. या अनोखी उपक्रमात आनंद आल्याची माहिती विदुला कुलकर्णी यांनी दिली, तसेच प्रथमच पाण्याखाली योगा करण्याचा प्रयत्न केल्याचे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या २२ मिनिटांत उभ्याने पर्वतासन,त्रिकोणासन,वीर भद्रासन, नटराजासन व देव मुद्रा तर बैठक स्थितीत पर्वतासन, सिहासन, भुजंगासन, सुलभासन,पद्मासन त्याचबरोबरीने श्लोक आणि ओंकार करण्यात आल्याची माहीती नौदलाचे निवृत्त कमांडो रवी कुलकर्णी यांनी दिली. यापूर्वी याच जलतरण तलावात देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पाण्याखाली ध्वजारोहण व परेड केली होती.