उरण : नवरात्रोत्सव काळात गावोगावी भरविण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेत उरणच्या चिटफंड घोटाळ्यातील व्यक्ती आणि त्यांच्या व्यवहार व वागणूक यांची प्रतिकृती सादर केली गेली. याला समाजमाध्यमातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. उरणच्या चिटफंड घोटाळ्यातील दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. मात्र जनतेकडून दुपटीच्या आमिषाने कोट्यवधी रुपये जमवून त्याचा वापर करीत ज्या पद्धतीने त्याचे प्रदर्शन करण्यात आले, त्याची लहान मुलांनी वेशभूषा करत स्पर्धेत सहभाग घेतला.

हेही वाचा : नवी मुंबईत आमदार, खासदारांसाठी घरे; सिडकोचे न्यायमूर्ती, सनदी अधिकाऱ्यांसाठीही आरक्षण, चार बेडरूमच्या सर्वाधिक सदनिका

हेही वाचा : नवी मुंबईत बेकायदा राहणारे चार बांगलादेशी नागरिकांवर कारवाई; मुंबई दहशदवाद विरोधी पथकाची कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यामध्ये त्यांनी परिधान केलेल्या कपडे आणि दागिने खाण्याच्या पद्धती यांची हुबेहूब नक्कल करीत असल्याचे चित्रण करण्यात आले आहे. या सादरीकरणाला समाजमाध्यमातून प्रतिसाद मिळाला आहे. एकीकडे ३० आणि ४० दिवसात गुंतवलेली रक्कम दुप्पट देण्याच्या आमिषाने फसवणूक झालेल्या हजारो नागरिकांना प्रतीक्षा आहे. मात्र याची जोरदार चर्चाही समाजमाध्यमातून होत आहे. नवरात्रोत्सवात भरविण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेत उरणच्या चिटफंड घोटाळ्याचे प्रतिबिंब मुलांनी सादर केल्याने पुन्हा एकदा या घोटाळ्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.