उरण : येथील खाडीकिनारी असलेल्या अनेक पाणथळी पाणी बंद करून किंवा मातीचा भराव टाकून नष्ट केल्या जात आहेत. त्यामुळे या परिसरात येणाऱ्या हजारो पक्षांनी नवीन पाणथळ्यांचा शोध सुरू केला आहे. उरण परिसरातील सकस आहार आणि पोषक वातावरणामुळे येणाऱ्या पर्यटक पक्षांमधील फ्लेमिंगो पक्षी हा सर्वांचाच आकर्षणाचा भाग ठरला आहे.

उरण तालुका नैसर्गिक संपत्तीने नटलेला आहे. या निसर्गात येथील वन्यजीव अधिकच भर टाकत असतात. येथील खाडीभागातील पाणजे- डोंगरी या भागातील पाणवठ्यावर हजारो फ्लेमिंगोंसह विविध पक्षांच्या शेकडो प्रजाती पाहायला मिळतात. परदेशी पक्षी देखील मोठ्या संख्येने या भागात असल्याने पक्षीप्रेमी, पक्षी अभ्यासक, छायाचित्रकार तसेच निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने येथे येत असतात. सकस आहार आणि पोषक वातावरण येथे असल्याने फ्लेमिंगो पक्षी हजारोंच्या संख्येने याठिकाणी जलविहार करताना पाहायला मिळतात. मात्र येथे असणाऱ्या उच्चदाबाच्या विद्युतवाहिन्या सध्या या फ्लेमिंगी पक्षांना जीवघेण्या ठरू लागल्या आहेत. या भागात विद्युत वाहिन्यांचे मोठे टॉवर असून, हे पक्षी विहार करताना विद्युत वाहिन्यांच्या संपर्कात येऊन विजेच्या धक्क्याने त्यांना प्राण गमवावे लागत आहे. दररोज २ ते ४ पक्षी विजेचा धक्का लागून मृत्यू होत असल्याचे पक्षीप्रेमींचे म्हणणे आहे. याबाबत वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याने पक्षीप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या दबावापुढे न झुकण्याची भाजपची भूमिका

उरण तालुक्यातील पाणथळीवर १०८ प्रकारच्या प्रजातींचे सुमारे ५ लाख विविध प्रकारचे पक्षी येथे येतात. हा परिसर फिडींग ग्राऊंड नसून तो बिडींग ग्राऊंड, नर्सिंग ग्राऊंड आणि प्रॉपर डेस्टिनेशन देखील आहे. काही पक्षी निव्वळ उपजिविकेसाठी येतात, तर काही पक्षांची इथे परिसरातील अनेक पाणवठे हे नष्ट करण्यात आल्याने मोठी पंचाईत झाली आहे. अन्नाच्या शोधात, पाण्याच्या शोधात येथे आलेल्या परदेशी पक्षांची तडफड सूरू आहे.

हेही वाचा – जालन्यात रावसाहेब दानवे यांच्या विरोधात कोण याचा तिढा सुटेना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उरण तालुका हा येथे येणाऱ्या फ्लेमिंगो, पेंटेड स्टोर्क, ईबीस, स्पुनबिल, ओपनहेडबिल यासारख्या पक्षांमुळे वन्यजीव प्रेमी, पक्षीप्रेमी व पक्षी निरीक्षकांमध्ये प्रसिद्ध होते. येथील येणाऱ्या पक्षांचे निरीक्षण, अभ्यास व छायाचित्र काढणाऱ्यांची येथील किनाऱ्यावर गर्दी होत असे. आत्ता मात्र येथील पणावठ्याचे भाग नष्ट होऊ लागले आहेत. तालुक्यातील भेंडखळ पाणथळी, सावरखार पाणथळी, पागोटे पाणथळी, बेलपाडा पाणथळी, दास्तान फाटा येथे भराव झाल्यामुळे अगोदरच येथील पक्षांची आश्रयस्थाने नष्ट झाली आहेत. त्यातच आत्ता पाणजे पाणथळ सुकविल्याने पक्षीप्रेमींमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे.