उरण : नगर परिषदेच्या नवीन प्रारूप प्रभाग रचनेनंतर शहरातील प्रभागाची संख्या नऊ ऐवजी दहा झाली आहे. शासनाच्या नियमानुसार १७ सदस्य संख्या वाढून नगराध्यक्ष वगळून तीनने वाढली असून २१ पर्यंत पोहचली आहे.

९ प्रभागातून प्रत्येकी दोन तर एका प्रभागातून तीन सदस्य अशी २१ सदस्य संख्या झाली आहे. या नव्या प्रभाग रचनेला एकही हरकत दाखल झालेली नाही. त्यामुळे हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे सादर करण्यात आला आहे. प्रभाग रचनेवर तक्रारी नसलेली उरण ही रायगड जिल्ह्यातील एकमेव नगरपरिषद ठरण्याची शक्यता आहे. मागील तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवट आहे.

उरण नगरपरिषदेचा कारभार मागील तीन वर्षांपासून प्रशासनाकडे सोपविण्यात आला आहे. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर उनपची अंतिम प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याआधी १७ हजारांहून अधिक मतदारांची संख्या असलेल्या उनपमध्ये ९ प्रभागातुन १८ सदस्य व नगराध्यक्ष पदासाठी निवड केली जात होती.आता नवीन प्रभाग रचने नंतर प्रभागाची संख्या नऊवरुन दहा झाली आहे.तर सदस्य संख्या नगराध्यक्ष वगळून तीनने वाढली असून २१ पर्यंत पोहचली आहे.९ प्रभागातून प्रत्येकी दोन तर एका प्रभागातून एकूण तीन सदस्य अशी २१ सदस्य संख्या आहे.

उरण नगर परिषदेच्या अंतिम प्रभाग रचनेचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी समीर जाधव यांनी दिली.