उरण : रस्ता दुरुस्तीसाठी उरण पनवेल मार्गावरील पेट्रोल पंप ते कोटनाका दरम्यानचा मार्ग बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे उरण – पनवेल मार्ग ८ डिसेंबरपासून बंद राहणार आहे. रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे. रस्ता बंद झाल्याने वळसा घालून पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.
उरणकरांसाठी नेहमीच्या रहदारीचा रस्ता असलेला उरण पनवेल मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आनंदी हॉटेल नजीकच्या पुलाच्या दुरुस्तीसाठी मार्ग बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे उरण शहरात ये – जा करण्यासाठी नागरीकांना बाह्यवळण मार्ग ते कोटनाका हा पर्यायी रस्ता उपलब्ध असल्याची माहिती उरणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त अभियंता नरेश पवार यांनी दिली.
हेही वाचा – पनवेल : कळंबोलीला ट्रेलरच्या चाकाखाली झोपलेल्याला चिरडले
चारचाकी वाहनांना बंदी
पेट्रोल पंप ते कोटनाका या पर्यायी मार्गावरून दुचाकी आणि रिक्षा या वाहनांना प्रवेश आहे. मात्र चारचाकी वाहनांना मात्र प्रवासास बंदी करण्यात येणार आहे.