शीव-पनवेल महामार्गावर वाशी प्लाझाजवळील पुलावर गुरुवारी पहाटेच्या सुमारास सहा गाडय़ांचा अपघात झाला. त्यामध्ये डंपर व एचपी गॅस टँकरमध्ये एक चारचाकी गाडी दाबली गेली. त्यात सहा प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर वाशी एमजीएम व अपोलो रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

श्रेयस अरविंद प्रधान हे वॅगनार गाडीतून मुंबईहून खारघरकडे जात होते. मागून आलेल्या स्कॉर्पिओने वॅगनारला जोरदार धडक दिली त्यामुळे वॅगेनार मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर गेली. स्कार्पिओ कार पनवेलकडे जाणाऱ्या मार्गिकेवर बंद पडली. मागून येणारा गॅस टँकर स्कोडा कार, डंपर, आय टेन कार ही वाहने एकमेकांवर आदळल्याने मोठा अपघात झाला यात सर्व गाडय़ांचे मोठे नुकसान झाले. स्कॉर्पिओचा चालक हर्षद प्रकाश पाटील (उरण) याने मद्यपान करून भरधाव वाहन चालवल्यामुळे त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाआधी बॅरिकेड लावून वाहने वाशी प्लाझा उड्डाणपुलाखालून सोडण्यात येत आहेत.  वाहन अडकल्याने महामार्गावरील पुण्याकडे जाणारी वाहतूक उशिरापर्यंत संथगतीने सुरू होती, असे वाशी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले.