मतमोजणीसाठी प्रशासन, पोलीस यंत्रणा सज्ज; नेते, कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता शिगेला
या वेळी विधानसभा निवडणुकीसाठी कमी मतदान झाल्याने प्रमुख पक्षांच्या उमेदवारांच्या मनात धाकधूक कायम आहे. त्यामुळे गुरुवारी (ता.२४) होत असलेल्या मतमोजणीनंतर सत्तेचा सारीपाट कोण जिंकणार, याची उत्सुकता नेत्यांसह कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये वाढली आहे.
बेलापूर आणि ऐरोली मतदारसंघात नवी मुंबईच्या राजकारणातील मातब्बर गणेश नाईक यांनी दोन्ही मतदारसंघांवर त्यांचा दावा सांगितला होता. मात्र भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्यामुळे त्यांना बेलापूर मिळाले नाही. त्यामुळे संदीप नाईक यांना पित्यासाठी ऐरोलीचा मतदारसंघ सोडावा लागला. मनसेच्या गजानन काळे हे रिंगणात उतरल्याने बेलापूरमधील लढत तिरंगी होणार आहे. उरणमध्ये (पान ४ वर)
नवी मुंबईत सत्तावान कोण?
भाजपचे नेते महेश बालदी यांनी बंडखोरी केली आहे. ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवित असून त्यांनी या मतदारसंघात चुरस निर्माण केली आहे.
राज्यातील सर्वात मोठा मतदारसंघ पनवेल आहे. या मतदारसंघात राजकीय पक्ष आणि अपक्ष असे मिळून १० उमेदवार नशीब अजमावत आहेत. या मतदारसंघात प्रशांत ठाकूर हे प्रमुख उमेदवार आहेत.
उरण विधानसभा मतदारसंघात शेकाप, शिवसेना आणि अपक्ष उमेदवार यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. उरणमधून शेकापचे माजी आमदार विवेक पाटील, शिवसेनेचे आमदार मनोहर भोईर तसेच भाजपचे बंडखोर उमेदवार महेश बालदी यांनी प्रचाराची राळ उठवली होती. त्यावरून उठवलेल्या तर्कवितर्काना गुरुवारी पूर्णविराम मिळणार आहे.
उरण
-जासई येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या इमारतीत सकाळी ८ वाजता मोजणीला सुरुवात होईल.
– यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून कडक बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
-मतमोजणीसाठी एकूण १५ मेज (टेबल) लावण्यात येणार आहेत. मोजणीच्या एकूण २४ फेऱ्या होण्याची शक्यता आहे.
-दुपारी दीडपर्यंत अंतिम निकाल अपेक्षित असल्याची माहिती उरण विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी पाटील यांनी दिली.
-सात वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ६४ पोलीस अधिकारी तसेच १६० हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी दिली.
राजकीय ताणेबाणे आधी एकटे..आता एक
- बेलापूर आणि ऐरोली दोन्ही मतदारसंघांत या निवडणुकीत मतदारांची मोठी वाढ झाली असूनही या दोन्ही मतदारसंघांत मतदारांमधला निरुत्साह ही बाब ठळक आहे. या वेळी मतदानाची टक्केवारी घसरली आहे. त्यामुळे दोन्ही मतदारसंघांत मतांची गणिते बदलल्याचे पाहायला मिळणार आहे.
- २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बेलापूर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे गणेश नाईक, भाजपच्या मंदा म्हात्रे आणि शिवसेनेचे विजय नाहटा यांच्यात चुरशीची लढत झाली होती. त्यावेळी गणेश नाईक यांचा फक्त १४९१ मतांनी पराभव झाला होता. तर मंदा म्हात्रे विजयी झाल्या होत्या.
- ऐरोली मतदारसंघातून २०१४ ला संदीप नाईक यांनी चौगुले यांचा ८७२५ मतांनी पराभव केला होता. त्यामुळे यावेळी गणेश नाईक हे युतीचे उमेदवार असल्याने नाईक किती मताधिक्याने निवडून येणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
उरणचे रण
उरण विधानसभा मतदारसंघ राजकीयदृष्टय़ा साक्षर आणि संवेदनशील आहे. या मतदारसंघात नेत्यांची वानवा नाही. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत मतदार कोणाच्या पारडय़ात आपली मते टाकणार हे सांगणे जवळपास कठीण असते. या वेळी दोन प्रमुख पक्ष आणि एक अपक्ष यांच्यात ही लढत रंगण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत कमी झालेल्या मतदानामुळे कोणाला धक्का बसणार वा कोण सत्तासंपादन करणार, याबद्दल उत्सुकता वाढली आहे.
पनवेल
ल्ल पनवेलमध्ये वि. खं. विद्यालयात मतमोजणी होत आहे. या वेळी १५ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.
ल्ल गुरुवारी पहाटे साडेसहा वाजता स्ट्रॉगरूमच्या (अतिसंवेदनशील कक्ष) बाहेर काढल्या जातील. मतमोजणीला सकाळी आठ वाजता प्रत्यक्षात सुरुवात होईल.
ल्ल पहिल्या अर्धा तासात टपालाने आलेल्या विविध सरकारी कर्मचाऱ्यांची मते मोजली जातील. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांतील मतांची मोजणी सुरू होईल.
ल्ल मोजणीच्या काळात १०० मीटपर्यंत कोणतेही वाहन आणता येणार नाही. तसेच प्रत्यक्ष मतमोजणीपासून सुमारे ५०० मीटर अंतरापेक्षा दूर विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना उभे राहण्याची सुविधा असेल.