उरण : इंडियन ऑइल कंपनीत धुतुम मधील प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याच्या आश्वासनाची अंमलबजावणी  न केल्याने संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता ठाकूर यांच्या नेतृत्वात शुक्रवारी दोन तास प्रवेशद्वार बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलन कर्त्याना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये ११  महिला तर ९ पुरुष आहेत. त्यांना न्हावा शेवा पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.

हेही वाचा >>> पनवेलमध्ये दोन फिरते दवाखाने; महापालिकेच्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी सुविधा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धुतुम मधील ग्रामस्थांनी महिनाभरापूर्वी  केलेल्या आमरण उपोषणा नंतर कंपनी व्यवस्थापनाने ५ जानेवारीला पाच प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याचे मान्य केले होते. मात्र आश्वासन देऊनही कंपनी व्यवस्थापनाने त्याची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्याच्या निषेधार्थ सकाळी ११ वाजता ग्रामस्थांनी गेटबंद आंदोलन केले. त्यांतर पोलीसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले असल्याची माहिती  उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली आहे. सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होते. कंपनीने दिलेल्या अश्वासनाची अंमलबजावणी करावी आणि ज्यांच्या जमीनी प्रकल्पासाठी संपादीत करण्यात आल्या आहेत त्यांचीच नोकर भरती व्हावी यासाठी आंदोलन केले असल्याची माहिती धुतुम ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता ठाकूर यांनी दिली.