नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छता अभियानात स्वतःला झोकून दिले आहे. सर्वत्र स्वच्छता ठेवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. शहरातील मोकळ्या भूखंडावर किंवा इतरत्र ठिकाणी टाकल्या जाणाऱ्या राडारोड्यावर कारवाई करण्यासाठी डेब्रिज भरारी पथक ही आहेत. मात्र शहरातील काही मोकळ्या भूखंडावर आजही राडारोडा, कचऱ्याचे ढीग निदर्शनास पडत आहेत.

हेही वाचा- नवी मुंबई : नवं वर्षाच्या स्वागतादरम्यान शेतघर, डोंगर, वन परिसर, आणि धरण परिसरातही पोलिसांची नजर 

कोपरखैरणे से. १९ येथील जुन्या तलावात भर टाकण्यात आली असून हा भूखंड आता मोकळा आहे. पंरतु याठिकाणी दिवसेंदिवस राडारोडा आणि कोपऱ्यात प्लास्टिक कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. स्वच्छता सर्वेक्षण अंतर्गत भिंतीवर दरवर्षी ही रंगरंगोटी केली जात आहे. या भूखंडालगत लोखंडी ग्रील देखील बांधण्यात आलेली आहे. परंतु हा मोकळा भूखंड कचऱ्याच्या विळख्यात अडकला आहे. याठिकाणी महापालिकेचा स्वच्छता राखा,राडारोडा, कचरा टाकू नये असा फलक देखील लावण्यात आलेला आहे. तरी देखील हा परिसर अस्वच्छ झाला आहे. आगामी स्वच्छतेत शहराला पहिल्या क्रमांकाचे नामांकन मिळावे म्हणून महानगरने कंबर कसली आहे. त्याकरिता पालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत साफ सफाई ची कामे युद्ध पातळीवर सूरु करण्यात आली आहेत. मात्र ही साफसफाई करताना शहरातील मोकळ्या भूखंडावर पडलेला राडारोडा, कचरा बाधा आणत आहेत. आज शहारत बऱ्याच ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी डेब्रिज माफियांकडून राडारोडा टाकला जातोय.

हेही वाचा- नवी मुंबईत करोनाबाधित रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, महापालिका सतर्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वास्तविक नवी मुंबईत राडारोडा टाकण्यास मनाई आहे. डेब्रिज माफिया शहारत कुठेही डेब्रिज खाली करतात आणि शहराच्या सौंदर्यात बाधा निर्माण करतात. नवी मुंबई महानगरपालिका शहरातील मुख्य रस्ते, महामार्ग या ठिकाणी सर्व उपाययोजना करून स्वच्छता आणि परिसर आकर्षक करण्यात मग्न आहेत. परंतु शहरातील अंतर्गत स्वच्छतेकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे. शहरातील अंतर्गत स्वच्छतेकडे ही लक्ष देण्याची गरज आहे अन्यथा त्याचा स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेतील नामांकांनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.