उरण : मंगळवारी सकाळी ७.५० च्या उरण – नेरुळ लोकलने प्रवास करणाऱ्या उरणमधील एका महिलेची चालत्या लोकल मध्येच प्रसूती झाली आहे. यात या महिलेला मुलगी झाली आहे. यावेळी जनरल बोगीतील महिला आणि मुलींनी मदतीचा हात पुढे करीत प्रसूत झालेल्या महिलेला मदत केली. तर प्रवाशांनी लोकल चालकाला संपर्क साधला त्यामुळे नेरुळ स्थानकात रेल्वे पोलीसांच्या सहकार्याने महिलेला रुग्णवाहिकेतून नेरुळ येथील मीनाताई ठाकरे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती महिलेचे पती मुजीम सय्यद यांनी दिली आहे.

उरणच्या भवरा परिसरात रहाणाऱ्या आणि मोलमजुरी करून गुजराण करणारे मुजमी सय्यद यांच्या गरोदर पत्नीला सोमवारी रात्री पासूनच त्रास सुरू झाला. त्यांनी रात्री रुग्णालयात जाऊन तपासणी केली. बरं वाटत असल्याने सकाळी ते ७.५० च्या उरण नेरुळ लोकल मधून नेरुळला जात होते. लोकल उलवे नोड मधील बामणडोंगरी स्थानकात ८.२० वाजता पोहचली असता या महिलेला पोटात प्रसूती कळ आली त्याचवेळी तिची धावत्या लोकलमध्ये प्रसूती झाली. त्याचक्षणी डब्यातील निकिता शेवेकर या आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी याच डब्यातून जात होत्या त्यांनी पुढाकार घेत प्रवास करणाऱ्या इतर महिला आणि मुलींच्या सहकार्याने ओढण्या गोळा करून पडदे धरले आणि नेरुळ स्थानकापर्यंत प्रसूत महिलेला धीर दिला.

आणखी वाचा-नवी मुंबई : ५० फुटांवर दोन बस बंद पडल्याने वाहतूक कोंडी 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर रेल्वे पोलिसांच्या सहकार्याने नेरुळ रेल्वे स्टेशनमध्ये रात्रपाळी ड्युटीकरीता कर्तव्यावर हजर असलेल्या पोलिसांनी महिलेस ऍम्ब्युलन्सद्वारे मीनाताई ठाकरे हॉस्पिटल नेरुळ येथे सुखरूप दाखल केल्याची माहिती वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटारे यांनी दिली.