कामोठे वसाहतीमध्ये रात्री मोबाईलवरुन एका महिला पत्रकाराला धमकावल्याची घटना घडली आहे. याबाबत संबंधित महिला पत्रकाराने रितसर पोलीसांत तक्रार केली असून पोलीस संबंधित फोन करणा-या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

हेही वाचा- व्यवहारातील पैसे दिले नाहीत म्हणून अपहरण; तिघांविरोधात गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रविवारी रात्री पावणे अकरा वाजता कामोठे वसाहतीमधील सेक्टर १९ मध्ये राहणा-या ५३ वर्षीय महिला पत्रकाराला त्यांच्या मोबाईल फोनवर फोन आला होता. संबंधित व्यक्तीने त्याचे नाव सांगितले नसले तरी शिवीगाळ व अश्लिल भाषेचा वापर करुन या महिला पत्रकाराला धमकावले. संबंधित व्यक्तीच्या व्यवसायाचा व्हिडीओ युट्यूबवर का प्रसिद्ध केला, असा जाब विचारुन संबंधित व्यक्तीने महिला पत्रकाराला शिवीगाळ केल्याने या पत्रकाराने पोलिसांत गुन्हा नोंदविला.