पंधरा ते वीस स्वयंसेवी बचत गट सहभागी
इरा फॉर वुमन या संघटनेच्या संकल्पनेतून आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चरतर्फे बेलापूर येथील अर्बन हाटमध्ये वुमन्स आर्ट क्राफ्ट अँड फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांनी महिलांसाठी आयोजित केलेली ही व्यापार पेठ २८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत सुरू राहणार आहे.
यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, बिहार, ओदिशा, प. बंगाल आदी राज्यांतील कलाकारांची विक्री केंद्रे असतील. या उपक्रमाच्या प्रचारासाठी पंधरा महिला दुचाकीवरून नवी मुंबईच्या विविध भागांत बाइकफेरी काढणार आहे. पर्यावरण जागरूकता, वर्ष जल संचयन, स्वच्छता आणि पर्यावरणस्नेही उत्पादनांची विक्री हा इरा फॉर वुमन संस्थेचा मानस आहे.
विविध ठिकाणच्या संस्कृतींचे खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू आदींचा समावेशही या पेठेत आहे. नवी मुंबईतील पंधरा ते वीस स्वयंसेवी बचत गट यात सहभागी होणार आहेत.
याशिवाय महिलांसाठीच्या विविध शसकीय योजना, उत्पादन, विक्री, विपणन आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Oct 2015 रोजी प्रकाशित
अर्बन हाटमध्ये महिलांची महिलांसाठी व्यापार पेठ
प्रचारासाठी पंधरा महिला दुचाकीवरून नवी मुंबईच्या विविध भागांत बाइकफेरी काढणार आहे.
Written by मंदार गुरव

First published on: 22-10-2015 at 05:04 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Womens open market for women in arban heart