Yashashree Shinde : यशश्री शिंदेची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. २५ जुलैला ही घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी तिचा मारेकरी दाऊद शेखला अटक केली. मात्र यशश्री शिंदेचा ( Yashashree Shinde ) मोबाइल दाऊदने लपवून ठेवला होता असं समजलं होतं.आता तो मोबाइल पोलिसांना सापडला आहे. त्यामुळे पोलिसांनी हा मोबाइल आता फॉरेन्सिककडे पाठवला आहे.

२५ जुलैच्या दिवशी यशश्री शिंदेची हत्या

उरण येथे राहणारी तरुणी यशश्री शिंदेची ( Yashashree Shinde ) अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. तिच्या शरीरावरचे अवयव कापण्यात आले. तिचा छिनविछिन्न मृतदेह पोलिसांना २७ जुलै रोजी आढळून आला. उरण मध्ये राहणारी ही तरुणी यशश्री शिंदे आणि तिची हत्या करणारा दाऊद शेख हे एकमेकांच्या संपर्कात होते. यशश्री शिंदे शाळेत असल्यापासून दाऊद शेख तिला ओळखत होता. यशश्री शिंदे हत्या प्रकरणात दाऊद शेखला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दाऊदने यशश्री शिंदेला ( Yashashree Shinde ) जेव्हा २५ जुलैच्या दिवशी भेटायला बोलवलं तेव्हा तो चाकू बरोबर घेऊनच आला होता अशी माहिती पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी माध्यमांना दिली.

Suraj Chavan
“जर सूरज चव्हाणने बिग बॉसची ट्रॉफी जिंकली तर मी पुढचा सीझन बघणार नाही”, असं का म्हणाली अभिनेत्री?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Uran Yashashree Shinde Murder Case Updates
Yashashree Shinde Murder Case : “यशश्री शिंदेच्या अंगावर दोन टॅटू, एकावर दाऊदचं नाव, दुसऱ्या..” पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?
Yashshree Shinde News An Open Letter to her
Yashashree Shinde : प्रिय यशश्री, …तर तू वाचली असतीस गं!
School Male Cleaner Abuse Girls in Badlapur
Badlapur School Case : “दादाने माझे कपडे काढले”, बदलापूर अत्याचार प्रकरणातील घाबरलेल्या मुलीने पालकांना दिली होती माहिती; FIR मध्येही नोंद!
Dhananjay Powar wife and mother expressed displeasure accusing of Bigg Boss marathi
Video: धनंजय पोवारच्या पत्नी व आईने ‘बिग बॉस’वर आरोप करत व्यक्त केली नाराजी, म्हणाल्या, “त्याला दाखवतंच नाहीये काय भानगड…”
What Sushma Andhare Said?
Badlapur Crime : “बदलापूरचा नराधम अक्षय शिंदे ऐवजी अकबर खान किंवा शेख असता तर..”, सुषमा अंधारेंचं वक्तव्य
News About Sanjoy Roy What His Mother in Law Said?
Sanjoy Roy : “संजय रॉयला फाशी दिली तरीही आम्हाला काहीच..”, कोलकाता प्रकरणातील आरोपीच्या सासूची प्रतिक्रिया

दाऊद शेखने २५ जुलैला केली यशश्रीची हत्या

पोलिसांनी यशश्रीच्या ( Yashashree Shinde ) हत्येबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, मयत यशश्री आणि आरोपी दाऊद हे एकाच शाळेत शिकत होते. दाऊदने मधूनच शाळा सोडली होती. त्यानंतरही दाऊद यशश्रीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करायचा. आरोपी दाऊदकडे यशश्रीचे काही फोटो होते, जे तो फेसबुकवर अपलोड करण्याची धमकी देत असे. खून होण्याच्या एक दिवस आधी म्हणजे २४ जुलै रोजी यशश्री आणि दाऊत एकमेकांना भेटले होते. यशश्रीने ( Yashashree Shinde ) आपल्यासह बंगळुरूला यावे, यासाठी आरोपीने तगादा लावला होता. तसेच फेसबुकवर तिचे काही फोटोही अपलोड केले होते. मात्र २४ जुलैला यशश्रीने त्याची भेट घेतल्यानंतर त्याने फोटो डिलिट केले असं पोलिसांनी सांगितलं. आता पोलिसांना यशश्रीचा मोबाइल सापडला आहे.

हे पण वाचा- Yashashree Shinde : प्रिय यशश्री, …तर तू वाचली असतीस गं!

Yashashri Shinde News
पोलिसांना यशश्री शिंदेचा मोबाइल रेल्वे ट्रॅकवर मिळाला आहे. पोलिसांनी तो फॉरेन्सिक लॅबला पाठवला आहे. (फोटो सौजन्य-एक्स)

पोलिसांनी मोबाइलबाबत काय सांगितलं?

आरोपीने दिलेल्या माहितीनंतर सदर ठिकाणी जावून पोलिसांनी शोधमोहीम केली असता मोबाईल मिळाला. पण मोबाईल पावसात भिजल्याने सुरू होत नाही. त्यामुळे फॅारेन्सिक लॅबला मोबाल पाठवण्यात आला आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेला सुरा सुध्दा पोलिसांनी जप्त केला आहे.गुन्ह्यातील महत्वाचे पुरावे हाती लागल्याने आरोपी दाऊद शेखला कडक शिक्षा सुनावण्यासाठी याची मदत होणार आहे. पाच वर्षांपासून आमच्या दोघांमध्ये मोबाईलवरुन संपर्क होता, अशी कबुली अटकेनंतर दाऊद शेखनं दिली आहे. मात्र, यशश्रीचा मोबाईल गहाळ झाला होता. त्यामुळे पोलिसांकडे दाऊदनं कबुली दिल्यानंतरही ठोस पुरावा नव्हता. आता यशश्रीचा ( Yashashree Shinde ) मोबाईल सापडल्यामुळे पोलिसांना या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे.