नवी मुंबई: नवी मुंबईत मंगळवारी दुपारी रबाळे येथील तलावात २५ वर्षीय युवकाने उडी मारून आत्महत्या केल्याचे समोर आले होते. त्याचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाने केला मात्र शोधण्यात मंगळवारी अपयश आले, मात्र बुधवारी सकाळी पुन्हा सुरु केलेल्या शोध मोहिमेत युवकाचा मृतदेह शोधण्यात अग्निशमन पथकाला यश आले आहे.

अश्पाक मुश्ताक अहेमद (वय २६) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. अश्पाक हा नवी मुंबई एमआयडीसी भागातील भीम नगर येथे राहणारा आहे. ठाणे बेलापूर महामार्गालगत असणाऱ्या तलावात त्याने उडी मारून आत्महत्या केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या तलावाचे शुशोभीकरण झालेले असून तलावाला कठडानंतर सकाळी फिरण्यासाठी केलेला रस्ता आणि रस्त्याच्या कडेला पुन्हा कठडा अशी रचना आहे. याच कठड्याला खेटून अश्पाक काही वेळ उभा होता. आणि अचानक जोरात धावत त्याने तलावाच्या संरक्षक ग्रीलवरून उडी मारली. काही वेळ गटांगळ्या खात शेवटी दिसेनाशा झाला.

याबाबत माहिती मिळताच रबाळे एमआयडीसी पोलीस आणि ऐरोली अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले. अग्निशमन दलाने त्याचा शोध घेण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरु केले, मात्र तो सापडला नाही. आज सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरु केली असता सकाळी आकाराच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी त्याचे वडीलही उपस्थित होते. मुलाचा मृतदेह पाहून त्यांनी टाहो फोडला. त्याने आत्महत्या का केली याबाबत मात्र स्पष्ट माहिती समोर आली नाही. याबाबत शोध सुरु आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.