सिलिकॉनची संयुगे सर्वत्र विपुल प्रमाणात सापडतात; वाळू, सिमेंट, चिनी-मातीची भांडी, ग्रॅनाईट, काच इत्यादी वस्तू सर्वश्रुत आहेत. आइस्क्रीम ठेवण्याच्या शीत-पेटीत तुम्ही कधी निळ्या रंगाचे खडे पाहिले आहेत का? यांना सिलिका-जेल क्रिस्टल म्हणतात, त्याचा निर्जलक म्हणून वापर होतो. पाणी शोषल्यावर त्यांचा रंग बदलतो. थोडय़ा वेगळ्या दर्जाची सिलिका-जेल ही प्रयोगशाळेत वर्णलेखी साधन   (chromatographic material)  आणि काही अभिक्रियांमध्ये उत्प्रेरक म्हणून नियमितपणे वापरली जाते. सिलिकॉन (Silicone), अर्थात पॉलिसिलोक्झेन्सही निष्क्रिय बहुवारिके (Inert polymers) असून सिलिकॉन, ऑक्सिजन आणि कार्बनी समूह यांपासूनच ती बनलेली असतात. मानवी शरीरास या सिलिकॉनशी कोणतेही वावडे (allergy) नसल्याने अथवा शरीर कोणतीही प्रतिक्रिया दर्शवीत नसल्याने याचे मानवी शरीरात आरोपण सुरक्षित मानले जाते. इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि संगणकामध्ये सिलिकॉन चिप्सचा सर्रास वापर आहे. कॅलिफोíनयामधील सॅन फ्रॅन्सिस्कोच्या उपनगरात दाटीवाटीने असलेल्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उद्योगांमुळे हा परिसर ‘सिलिकॉन व्हॅली’ या नावाने प्रसिद्ध आहे. हे बारसं केलं डॉन हिफ्लर या पत्रकाराने- १९७१ साली!

कार्बन, जम्रेनियम, टीन अन् लेड या अन्य भागीदारांसमवेत सिलिकॉन (Si) हे आवर्त सारणीतील गण १४ मध्ये मोडते. १४ अणुक्रमांक असलेल्या कार्बनच्या अगदी जवळचे हे मूलद्रव्य. कार्बन-संयुगे ही जीवमात्रांचा कणा समजला तर कार्बनचं हे पाठराखी भावंडदेखील मानवासाठी उपयुक्त, खरे तर कमालीचे उपयुक्त असे मूलद्रव्य आहे. सिलिकॉन अन् त्याची संयुगे ही आपल्या दैनंदिन जीवनात हरप्रकारे आपल्या दिमतीस असतात -काहींचा उल्लेख वर केला आहेच.

कार्बनप्रमाणे सिलिकॉनची अपरूपे ज्ञात नाहीत. सिलिका, सिलिकेट-गारगोटी, चिकणमाती – साधारणपणे या स्वरूपातच ते बहुतांश आढळते. ऑक्सिजनशी याचा तीव्र-बंध असल्याने सिलिकॉन ऑक्सिजनपासून वेगळे करणे महत्कठीण! सिलिकॉनच्या शोधाचे श्रेय जॉन जेकब बर्झेलिएस या स्वीडिश शास्त्रज्ञाकडे जाते. ह्य़ाने १८२३ मध्ये पोटॅशियम फ्लुओरोसिलिकेटमधून सिलिकॉन मूलद्रव्य वेगळे केले. कार्बनप्रमाणेच सिलिकॉनदेखील चतरुसयुजा दर्शविते आणि मुख्यत्वे सहसंयुज बंध तयार करते. तथापि, त्याची क्रियाशीलता मात्र कार्बनपेक्षा कमी असते. सिलिकॉन आकाराने मोठे असल्याने कार्बनप्रमाणे ppp πppp πअसा द्विबंध तयार करू शकत नाही; ते त्याच्या  कक्षिकेसोबत  ppp πppp π  असा द्विबंध तयार करते.

– डॉ. अनिल कर्णिक

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org