मराठीत गंधक म्हणून ओळखले जाणारे सल्फर हे मूलद्रव्य प्राचीन काळापासून भारतीयांना माहिती आहे. पारा आणि गंधक एकत्र करून तयार केलेल्या पदार्थाचा आयुर्वेदात औषध म्हणून वापर केला जात असे. भारतीयांप्रमाणेच प्राचीन इजिप्त, चीन आणि ग्रीक संस्कृतींनाही गंधक माहीत होते आणि औषध व कीटकनाशक म्हणून त्याचा उपयोग प्रचलित होता. गंधक हे मूलद्रव्य आहे हे फ्रेंच शास्त्रज्ञ अँटोनी लॅव्होझिएने १७७७ मध्ये सिद्ध केले.

पिवळ्या रंगाचे स्फटिक किंवा चूर्णरूपात गंधक निसर्गात शुद्ध स्वरूपात आढळते. ज्वालामुखीच्या जवळच्या प्रदेशात गंधकाचे साठे आढळतात. पृथ्वीवर विपुल प्रमाणात आढळणाऱ्या मूलद्रव्यांमध्ये गंधकाचा दहावा क्रमांक लागतो. सोने, प्लॅटिनम यांसारखे राजस धातू सोडले तर गंधकाची इतर सर्व मूलद्रव्यांबरोबर रासायनिक प्रक्रिया होते.

survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Shukra Gochar In Mesh
२४ एप्रिलपासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत?सुख-समृद्धीचा कारक ग्रह राशी बदल करताच मिळू शकते चांगला पैसा
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
Return journey to Alexander
भूगोलाचा इतिहास: ..जेव्हा सम्राट हतबल होतो!

१६ अणुक्रमांक असलेल्या गंधकाचा अणुभार ३२ आहे. गंधकाची ३० अपरूपे आढळतात. इतर कुठल्याही मूलद्रव्यांच्या अपरूपांपेक्षा ही संख्या जास्त आहे.

शुद्ध रूपातल्या गंधकाचा माणसाच्या आरोग्यावर कुठलाही विपरीत परिणाम होत नसला तरी मोटारींच्या धुरातून बाहेर पडणारा सल्फर डाय ऑक्साइड आणि हायड्रोजनबरोबर संयोगातून होणारा हायड्रोजन सल्फाइड हे दोन वायू मात्र धोकादायक असतात. सेंद्रिय संयुगांच्या रूपात गंधक हे सर्व सजीवांचा अविभाज्य घटक असते. आणि मानवी शरीरात ते फॉस्फरसइतक्याच विपुल प्रमाणात आढळते. प्रथिनं ज्यापासून तयार होतात त्या अमायनो आम्लांमध्ये गंधक एक महत्त्वाचा घटक असतो. तसेच बायोटीन आणि थायमिन या ‘ब’ वर्गातील जीवनसत्त्वांमध्येही गंधक असते. केराटीन या प्रथिनाला ताकद देण्याचे आणि पाण्यात अविद्राव्य करण्याचे काम या प्रथिनातील गंधक-गंधकाचे बंध करतात. केराटीन प्रथिनांपासून प्राण्यांची त्वचा, केस आणि पिसे तयार होतात. कोंबडीच्या अंडय़ातसुद्धा गंधकाचे प्रमाण खूप असते. नवीन पिल्लाची पिसे बनविण्यासाठी या गंधकाचा उपयोग होतो. यामुळेच सडणाऱ्या अंडय़ाला एक विशिष्ट प्रकारचा वास येतो. तो अंडय़ातील गंधक आणि हायड्रोजनच्या संयुगातून तयार झालेल्या हायड्रोजन सल्फाइड वायूचा असतो.

गंधकाचा उपयोग रबराचे ‘व्हल्कनायझेशन’ करण्यासाठी बंदुकीच्या दारूमध्ये आणि बुरशी प्रतिबंधक म्हणून होतो. परंतु गंधकाचा सर्वात मोठा उपयोग गंधकाम्ल (सल्फ्युरिक आम्ल) तयार करण्याकरिता केला जातो. तसेच वर्षांला जवळजवळ दहा कोटी टन इतक्या कॅल्शियम सल्फेट या गंधकाच्या संयुगाचा सिमेंट बनविण्याकरिता वापर केला जातो.

– योगेश सोमण, मुंबई</strong>

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org