स्वातंत्र्य आंदोलन काळातील ‘सरहद गांधी’ या नावाने लोकप्रिय झालेले अब्दुल गफार खान हे मूळचे पेशावरचे पठाण जमातीतले गांधीवादी. पठाण समाजाचा शैक्षणिक उत्कर्ष, समाजसेवा आणि देशभक्ती यासाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले होते. अब्दुल खाननी १९१० साली आपल्या गावी मशिदीत शाळा सुरू केली आणि पुढच्या वर्षी हाजीसाहेब यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले. त्यांच्या ब्रिटिश द्वेषामुळे आणि आंदोलनकारी तरुणांच्या बरोबर असलेल्या संबंधांमुळे १९१५ मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांच्या शाळेवर बंदी घातली. त्यामुळे खानसाहेबांनी काही काळ पठाण समाजासाठी सामाजिक सुधारणांचे कार्य करायचे ठरवून त्यासाठी ‘अंजुमन-ए-इस्लाह-ए-अफगानिया’ म्हणजे अफगाण नवनिर्माण समितीची आणि १९२१ मध्ये पश्तुन तरुणांसाठी ‘पश्तुन जिगरा’ अशा संघटना स्थापन केल्या. १९२८ मध्ये त्यांनी ‘पख्तून’ हे पुश्तो भाषेतले राजकीय विषयावरील मासिक सुरू केले.

यापूर्वीच महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानाने, अिहसक आंदोलनांमुळे प्रभावित झालेल्या अब्दुल गफार खानांनी १९१९ साली रोलेक्ट अ‍ॅक्टविरोधात झालेल्या आंदोलनात भाग घेऊन ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीत क्रियाशील झाले. अब्दुल गफार खान एक स्वतंत्र आणि धर्मनिरपेक्ष भारताची स्थापना होण्याचा ध्यास घेऊन त्या दृष्टीने कार्यरत होते. महात्मा गांधींच्या अिहसा आणि सत्याग्रह यांसारख्या सिद्धांतांनी प्रेरित होऊन अब्दुल खाननी १९२९ साली ‘खुदाई खिद्मतगार’ नावाची संघटना स्थापन केली. खुदाई खिदमतगार म्हणजे देवाचा सेवक. या संघटनेला ‘सुर्ख पोश’ म्हणजे लाल कुर्ता असेही म्हणत.

article about veteran feminist writer vidyut bhagwat career journey
व्यक्तिवेध : विद्युत भागवत
Why does hatred of Gandhi remain even today
गांधीद्वेष आजही का उरतो?
loksatta editorial on election results in france left wing alliance won most seat in french
अग्रलेख : फ्रेंच ट्विस्ट!
unknown miscreants” vandalised my house with black ink today Said Asaduddin Owaisi
ओवैसींची आगपाखड, “भ्याड सावरकरांसारखं वागू नका, घराला काळं फासून पळून..”
chandrakant patil replied to rohini khadse
“मी कोल्हापूरचा, मला बदामाची गरज नाही”, चंद्रकांत पाटील यांचे रोहिणी खडसेंना प्रत्युत्तर!
sunil tatkare on amol mitkari warning
“पूर्ण माहिती घेऊनच बोला”, ‘त्या’ विधानावरून सुनील तटकरेंनी टोचले अमोल मिटकरींचे कान; म्हणाले, “काही लोक जाणीवपूर्वक…”
anil deshmukh on devendra fadnavis resign
“माझी भाजपाच्या नेतृत्वाला हात जोडून विनंती आहे; त्यांनी फडणवीसांना…”; अनिल देशमुखांचं विधान चर्चेत!
ravindra waikar on evm hacking
“…म्हणून ४८ मतांनी माझा विजय झाला”; रवींद्र वायकरांनी सांगितलं मतांचं गणित; ईव्हीएम हॅक करण्याच्या आरोपावर म्हणाले…

अब्दुल खान यांच्या करिष्माई नेतृत्वामुळे या संघटनेत अल्प काळातच साधारणत: १० हजार तरुण पठाण अनुयायी सदस्य झाले. या संघटनेच्या लोकांनी सत्याग्रह, राजनैतिक संघटन या मार्गानी ब्रिटिश सरकारच्या पोलीस आणि लष्कराला विरोध करून सळो की पळो करून सोडले. लवकरच खुदाई खिदमतगार ही संघटना वायव्य सरहद्द प्रांत म्हणजे सध्याच्या पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील एक प्रमुख राजनैतिक शक्ती बनली.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com