बíलनमध्ये १९१९ साली विमर प्रजासत्ताक ऊर्फ जर्मन प्रजासत्ताक स्थापन होऊन बर्लिन शहर विधान मंडळाच्या निवडणुका होऊन त्यात यूपीएसडी या पक्षाला अधिक्य मिळाले आणि गुस्ताव्ह बॉब हा मेयरपदी नियुक्त झाला. विमर प्रजासत्ताकाचा एकूण कार्यकाळ इ.स. १९१९ ते १९३३ असा झाला. आक्टोबर १९२० मध्ये बर्लिनजवळची सात शहरे, ५९ खेडी आणि २७ जमीनदारी मालमत्ता बर्लिनमध्ये अंतर्भूत केल्यावर ९०० चौ.कि.मी. व्यापलेल्या या विशाल बर्लीनची लोकसंख्या ३८ लक्ष झाली. प्रशासकीय व्यवस्थेसाठी बर्लीनची वीस बरोजमध्ये विभागणी झाली. १९२० साली युरोप खंडातील सर्वात मोठे शहर बनलेले बर्लिन युरोपची सांस्कृतिक राजधानी बनली! या काळात नोबेल पुरस्कार प्राप्त अल्बर्ट आइनस्टाईन आणि फ्रिट्स हाबर बर्लिनमध्ये राहत होते. तसेच ओटो डिक्स, अमोल्ड झ्वीगसारखे प्रसिद्ध कलाकारही येथे राहत. १९२५ मध्ये बर्लिनची लोकसंख्या ४० लाखांवर पोहोचून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आकाशाला भिडल्या. औद्योगिक मंदीचा फटका या काळात बर्लिनला फार मोठय़ा प्रमाणात बसला. ७०० मोठे उद्योग दिवाळखोरीत निघाले, साडे सहा लक्ष माणसे बेरोजगार होऊन ठिकठिकाणी मोच्रे, संप, िहसक घटनांनी बर्लिन ढवळून निघाले. डाव्या आणि उजव्या राजकीय कार्यकर्त्यांमधील संघर्षांत रस्तोरस्ती खून पडू लागले. १९२८-१९२९ या वर्षांमध्ये बर्लिनमधील अशांत वातावरणात नॅशनल सोश्ॉलीस्ट पार्टी (एनएसडीएपी) या राजकीय गटाचा जोर वाढू लागला. ६ नोव्हेंबर १९३२ साली झालेल्या पार्लमेंटच्या निवडणुकांमध्ये हा पक्ष सर्वाधिक मते मिळवून बíलन आणि जर्मनीत सत्तेवर आला. वर्षभरातच, १९३३ साली नाझी म्हणजे नॅशनल सोश्ॉलीस्ट पक्षाची सूत्रे अडॉल्फ हिटलर याने ताब्यात घेऊन लोकशाहीवादी तत्त्वे गुंडाळून बíलन आणि जर्मनीतील त्याच्या विरोधकांची मुस्कटदाबी सुरू केली. हिटलरने प्रथम त्याचे कट्टर विरोधक कम्युनिस्ट आणि लोकशाही समाजवादी पक्षाच्या पार्लमेंट सदस्यांचे सदस्यत्वच रद्द केले. २१ मार्च रोजी हिटलरने आपल्या विरोधकांना अटक करून बर्लिनजवळच्या पहिल्या छळ छावणीत त्यांची रवानगी केली.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com
वाटाणा
अनुवंशशास्त्राचे जनक ग्रेगर जॉन मेंडल यांनी अनुवंशशास्त्राची मूळ तत्त्वे जगासमोर १८५६-१८६३ या काळात मांडली. ही सर्व तत्त्वे त्यांनी वाटाणा या वनस्पतीमध्ये अभ्यासली आणि अनुवंशशास्त्राचा पाया रचला. या त्यांच्या संशोधनामुळे जगाला अनुवंशशास्त्राचे एक नवीन दालन खुले झाले.
वाटाणा ही वनस्पती मूळची भूमध्यसागरी प्रदेशातील असून इजिप्त या देशामध्ये या वनस्पतीचे वास्तव्य आहे. इसवी सनपूर्व ४८०० ते ४४०० वर्षांपासून आढळते.भारतात उत्तर पश्चिम भागात इसवी सनपूर्व २२५० ते १७५० वर्षांपासून वाटाण्याचे अस्तित्व आढळते. गंगा नदीचे खोरे आणि दक्षिण भारतातील काही प्रदेशांत वाटाण्याचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. वाटाण्याचे पीक खरीप आणि रबी अशा दोन्ही हवामानात घेतात. वाटाण्याचे बी पेरल्यापासून साधारण दोन महिन्यांत दाणेदार शेंगा तयार होतात.
वाटाण्याचे शास्त्रीय नाव ‘पायसम सॅटाव्हम्’ आहे. फॅबीसी कुळातील ही वनस्पती पॅपिलिनोसी या उपकुळात येते. वाटाणा वेलवर्गीय असून या वनस्पतीस आधारासाठी तंतू असतात. मुळे गाठीयुक्त असतात. या गाठीत रायझोबियम जिवाणू असतात. त्यामुळे या गाठींना हवेतील नत्र हे मूलद्रव्य/ वायू शोषून घेता येतो, त्याचे स्थिरीकरण होते व त्यामुळे जमीन कसदार बनते. वाटाण्याची पाने संयुक्त प्रकारची असतात. फुले पांढरी- गुलाबी रंगाची असतात. फुलांच्या पाकळ्या विशिष्ट प्रकारच्या असतात. सर्वात मोठय़ा पाकळीला स्टॅडर्ड असे म्हणतात. त्याच्या खालच्या दोनांना ‘विंग्ज’ म्हणतात. विंग्जच्या खाली गवताच्या पात्यासारख्या ‘किल’ पाकळ्या असतात. शेंगा लहान व चपटय़ा असतात. शेंगा उघडल्यावर मुख्य शिरेच्या वर एकाआड एक असे दाणे असतात.
वाटाण्याचे कोवळे दाणे तोंडात टाकण्याचा मोह आपल्याला सगळ्यांनाच होतो, वाटाण्याच्या गोड दाण्यांमध्ये प्रथिने, कबरेदके, या मुख्य अन्नघटकांचे प्रमाण जास्त असते. कोवळे गोड लागणारे मटार जेव्हा सुकवले जातात तेव्हा त्यांच्यातील पाण्याचे प्रमाण कमी होते. पण प्रथिनांचे प्रमाण दुप्पट होते. वाटाणा फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शिअम, कॉपर, िझक अशा खनिजांनी युक्त असा आहे. एवढेच नाही तर ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘के’ ही जीवनसत्त्वे वाटाण्यात आढळतात. ओल्या आणि सुकलेल्या वाटाण्यापासून अत्यंत चविष्ट पदार्थ तयार केले जातात. असा हा रुचकर वाटाणा न खाणारा माणूस पृथ्वीवर सापडणे दुर्मीळच!
– डॉ. मनीषा करपे
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
संग्रहित लेख, दिनांक 23rd Mar 2016 रोजी प्रकाशित
विमर प्रजासत्ताक राजधानी बर्लिन
१९२० साली युरोप खंडातील सर्वात मोठे शहर बनलेले बर्लिन युरोपची सांस्कृतिक राजधानी बनली!
Written by लोकसत्ता टीम

First published on: 23-03-2016 at 05:23 IST
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: German prajasattak berlin city