मोरिंडा ही रुबिएसी कुलातील सर्वात मोठी प्रजाती असून भारतात तिच्या ११ प्रजाती आढळतात तर महाराष्ट्रात मोरिंडा सिट्रीफोलीया व मोरिंडा प्युबेसन्स या प्रजाती आढळतात. किनारी राज्यांमध्ये तमिळनाडू, केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि ओडिशा येथे ही प्रजाती सापडते. भारतात तसेच महाराष्ट्रात या प्रजाती ग्रेट मोरिंडा, भारतीय तुती, नोनी, बीच मलबेरी, चीज फळ, बारतोंडी अशा अनेक सामान्य नावांनी ओळखल्या जातात. ही प्रजाती खारफुटीसमवेत सापडत असून ती प्रतिकूल वातावरणातही वाढू शकते. ही प्रजाती क्षारता सहन करणारी आहे म्हणून उष्णकटिबंधीय सागरी किनारपट्टीच्या सीमान्त भागात वाढते.

मोरिंडाच्या फांद्या आणि खोड खडबडीत, लाकूड कठीण, पाने चकचकीत, अंडाकृती व गडद हिरवी, फुले पांढरी असतात. या झाडाला एका वर्षांतच दुधी रंगाची, बटाटय़ाच्या आकाराची फळे येतात. ही फळे वर्षभर येतात. त्यांची चव कडू असते, पण त्यात अनेक उपयुक्त गुणधर्म आहेत. फळे पानांप्रमाणे कच्ची किंवा पिकवून खाल्ली जातात.

nagpur wedding ceremony marathi news
आगळा वेगळा विवाह सोहळा! वर- वधूकडून एक हजारांवर औषधी वनस्पतींचे पाहुण्यांना वाटप
22 high tide days during monsoon
यंदा समुद्राला पावसाळ्यात २२ दिवस मोठी भरती…२०,२१ सप्टेबरला जुलैला सर्वात मोठी उधाणे, सुमारे पाच मीटर उंचीच्या लाटा उसळणार
plenty of water in koyna dam
विश्लेषण : राज्य दुष्काळात, तरी कोयना धरणात सुरक्षित जलसाठा कसा?
survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?

जीवनसत्त्वाचे उत्तम स्रोत म्हणून मोरिंडा वनस्पती पौष्टिक मानली जाते. संधिवात, पचन समस्या व आमांश यावर उपाय म्हणून या झाडाची पाने वापरतात. फळांचा वापर प्रामुख्याने केला जातो. परंतु बिया, पाने, साल आणि मुळांसह वनस्पतीचे सर्व भाग पारंपरिक औषधांमध्ये वापरले जातात. मोरिंडाच्या फळात ‘क’ जीवनसत्त्व आणि बीटा-कॅरोटीन मुबलक प्रमाणात असते. त्याचा उपयोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी केला जातो. मोरिंडाची विविध उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. कॅप्सूल, गोळय़ा, फळांचे रस इत्यादींचा वापर लोक आरोग्याच्या अनेक तक्रारींवरील उपचारांसाठी करतात. उदाहरणार्थ, याच्या फळाचा रस कर्करोग व उच्च रक्तदाबाच्या उपचारांमध्ये वापरला जातो. रसांचा दर्जा ठरवण्यात फळांचा रंग महत्त्वाची भूमिका बजावतो. मोरिंडाच्या फळापासून ‘नोणी’ नावाचा रस काढला जातो आणि तो आरोग्यदायी पेय तयार करण्यासाठी वापरला जातो. फळांना १०-१२ महिने काचेच्या भांडय़ात बंद करून, आंबवून त्यानंतर नोणी रस मिळवतात. तसेच मुळांपासून पिवळसर रंग काढला जातो, जो कापड रंगविण्यासाठी वापरतात.

डॉ. तरन्नुम मुल्ला ,मराठी विज्ञान परिषद