प्रत्येक समुद्राचा आवाज वेगळा असून त्या समुद्राची ती ओळख असते. पॅसिफिक महासागर तुलनेने शांत मानला जातो, तर हिंदी महासागर अशांत. काही ठिकाणी समुद्राचा किंचाळणारा आवाज तर काही ठिकाणी वाद्ये वाजल्यासारखा. कित्येक ठिकाणी वारा इतका जोराचा असतो की हू-हू असा आवाज निर्माण होतो. शास्त्रज्ञांच्या मते प्रत्येक समुद्राच्या आवाजामागे काही ना काही कारण असते.

समुद्राच्या मध्यभागी ‘द ब्लूप’ आणि ‘ज्युलिय’ हे दोन सर्वात लोकप्रिय व गूढ आवाज गेल्या अनेक वर्षांपासून ध्वनिमुद्रित केले गेले आहेत. या ध्वनींची संभाव्य उत्पत्ती वैज्ञानिक समुदायाकडून, गुप्त लष्करी सराव, महाकाय स्क्विड्स, व्हेल, व्यावसायिक मासेमारी नौका किंवा कदाचित विज्ञानाला अद्याप अज्ञात असलेल्या सागरी प्राण्याकडून होत असावी, असा कयास लावला जात असे. तो आवाज हिमकंपाचा किंवा हिमखंड फुटल्याचा आणि हिमनदीपासून तुटल्याचा होता हे अखेर निश्चित झाले.

survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Bridge in sea to connect Bandra Worli Sea Bridge and Sea Coast Road
वांद्रे वरळी सागरी सेतू आणि सागरी किनारा मार्गाला जोडण्यासाठी समुद्रात पूल
Unknown cargo ship collided with fishing boat in Palghar sea
पालघर समुद्रातील मासेमारी नौकेस अज्ञात मालवाहू जहाजाची धडक
Loksatta Lokrang Picture Painting Tourist places the sea
चित्रास कारण की: समुद्रसरडा

काही काळापूर्वी अंटाक्र्टिक महासागरात बदकासारखा विचित्र आवाज ऐकू आला. शास्त्रज्ञांनी खूप प्रयत्नांनंतर हे रहस्य सोडवले. त्या बदकासारख्या आवाजाला ‘बायो-डक’ असे टोपणनाव दिले गेले. हिवाळा आणि वसंत ऋतूत दक्षिण महासागरात ऐकू येणारा आवाज हा प्रत्यक्षात अंटाक्र्टिक मिंक व्हेलचा पाण्याखाली दात घासत असल्याचा आवाज आहे.

‘बम्र्युडा त्रिकोण’चा (डेव्हिल ट्रँगल) उल्लेख केल्याशिवाय महासागरांतील रहस्यांची यादी पूर्ण होणार नाही. मियामी, बम्र्युडा आणि पोर्तो रिकोदरम्यान महासागराच्या सुमारे १३ लाख ते ३९ लाख चौरस किलोमीटर त्रिकोणी आकाराला हे नाव दिले आहे. बम्र्युडा त्रिकोण ही सर्वात प्रसिद्ध समुद्र दंतकथांपैकी एक आहे. जेव्हा कोलंबसने प्रथम या भागावर प्रवास केला तेव्हा त्याने आकाशात प्रकाशाचा एक विशाल गोळा पाहिल्याचा दावा केला, जो क्षितिजावर कोसळला आणि चमकला. लवकरच या भागात अनेक प्रकारच्या विचित्र घटनांचा दावा केला जाऊ लागला. उदाहरणार्थ, इथे मोठय़ा संख्येने विमाने आणि जहाजे कोणताही मागमूस न सोडता गूढपणे गायब झाली आहेत. भौतिकशास्त्राच्या नियमांविरुद्ध घटना येथे घडत असल्याचे व त्यांस अवकाशातील घटकही कारणीभूत असल्याचे बोलले जाते. येथे प्रचंड मिथेन साठय़ामुळे वायूचे स्फोट होतात. काही अपघातांची कारणे शोधण्यात यश आले असले तरी, बऱ्याच अपघातांची कारणे अद्याप समजलेली नाहीत.

डॉ. चित्ररेखा कुलकर्णी,मराठी विज्ञान परिषद