अ‍ॅलन टय़ुरिंगना वाटायचे माणसे उपलब्ध माहितीच्या आधारे कारणे शोधून निर्णय घेतात, प्रश्न सोडवतात. मग यंत्रात, संगणकामध्ये योग्य त्या प्रणाली भरल्या तर ती यंत्रेही बुद्धिमान होतील, प्रश्न सोडवतील. १९५० साली टय़ुरिंग यांनी ‘कॉम्प्युटिंग मशिनरी अँड इंटेलिजन्स’ हा निबंध प्रकाशित केला. या निबंधात यंत्रांना किंवा संगणकाला बुद्धिमान कसे बनवायचे आणि त्या यंत्राची बुद्धिमत्तेची चाचणी कशी घ्यायची याबद्दल सविस्तर लिहिले आहे. हीच ती सुप्रसिद्ध

‘टय़ुरिंग टेस्ट’! कृत्रिम बुद्धिमत्तेचा इतिहास अ‍ॅलन टय़ुरिंग यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही!

Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…

मरविन मिन्स्की आणि डीन एडमन्ड्स यांनी प्रिन्स्टन विद्यापीठात १९५१ साली एक प्रयोग केला. त्यांनी पहिले शिकणारे आणि शिकत जाणारे यंत्र बनवले!

माणसाच्या मेंदूत कोटय़वधी चेतापेशी असतात. या पेशी एकमेकांना जोडून त्यांचे जाळे तयार होते. या असंख्य जाळय़ांचा उपयोग करून माणसाचा मेंदू लक्षात ठेवतो, शिकतो, सूचना देतो अशी अनेक कामे करतो. या मेंदूच्या जाळय़ांचा उपयोग करून एखादे यंत्र तयार करता येईल का? असे त्यांना वाटले आणि त्यांनी पहिले न्यूरल नेटवर्क सिम्युलेटर यंत्र तयार केले.

वेगवेगळय़ा वाटा असणारे जाळे तयार केले. एखादा उंदीर या जाळय़ातून एका विशिष्ट ठिकाणापर्यंत जाण्याचा मार्ग कसा शोधेल, याचे मॉडेलिंग या यंत्रात केले. या यंत्रात एकमेकांना जोडणारे काही कृत्रिम न्युरॉन्स होते. एखादा रस्ता चुकला की त्या यंत्राला कळत असे, लक्षात राहत असे आणि असा अनुभव आल्यावर ते दुसरा रस्ता शोधत असे. अगदी माणसासारखे- अनुभवातून शिकत जाणारे यंत्र. न्यूरल नेटवर्क संकल्पना वापरून तयार केलेले हे पहिले यंत्र!

कृत्रिम बुद्धिमत्ता शब्द जन्माला यायला १९५६ साल उजाडले. त्या वर्षी जॉन मॅकार्थी यांच्या पुढाकाराने अमेरिकेतील न्यू हम्पशायर येथील डार्टमथ कॉलेजमध्ये एक परिषद आयोजित करण्यात आली. माणसाच्या बुद्धिमत्तेचे विविध पैलू संगणक प्रणाली/ आज्ञावलीच्या मदतीने संगणकामध्ये आणता येतील का, याचा शोध घेणे हा त्या परिषदेचा मुख्य हेतू होता.

या परिषदेतच जॉन मॅकार्थी यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ हा शब्द सर्वप्रथम वापरला. संगणक क्षेत्रातील अनेक दिग्गज यात सहभागी झाले होते. या परिषदेमुळे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संशोधनाला चालना मिळाली. १९६३ साली स्टॅन्फर्ड विद्यापीठात कृत्रिम बुद्धिमत्तेची प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. अनेक अभ्यासक जॉन मॅकार्थी यांच्या या क्षेत्रातील बहुमोल योगदानामुळे त्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक मानतात.

– बिपीन देशमाने ,मराठी विज्ञान परिषद