कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून संगणक असुरक्षित केला जाऊ शकतो. हे काम एआय-पॉवर्ड मालवेअरच्या साहाय्याने केले जाते. एखाद्या संस्थेतील संगणकीय अंकीय मालमत्तेभोवती सुरक्षा कवच निर्माण करण्यासाठी सुरक्षा तज्ज्ञांनी फायरवॉल, हल्ला प्रतिबंध प्रणाली (आयपीएस), अनुमती नियंत्रण पद्धती (अॅक्सेस कंट्रोल सिस्टीम), बहुघटकीय प्रमाणीकरण (मल्टिफॅक्टर ऑथेंटिकेशन) यासारख्या सुरक्षा प्रणाली आणि तंत्रे विकसित केली आहेत. पण जगात १०० टक्के सुरक्षित असे काहीही नाही. अट्टल गुन्हेगार हल्ला करण्यासाठी कोणताही मार्ग वापरतात आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आगमनाने त्यांना आता जणू काही जादूचा दिवाच मिळाला आहे. पूर्वी संगणक शर्विलकाला वैयक्तिकरीत्या प्रत्येक प्रणालीवर जाऊन फोड करावी लागत असे. पण आता कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त प्रणाली आपोआप एकाच वेळी बऱ्याच संगणक जालांमध्ये (नेटवर्कमध्ये) जाऊन तिकडील कमकुवत क्षेत्रे शोधून त्यांवर हल्ल्याची योजना करू शकते. त्याशिवाय ज्ञात सुरक्षा प्रणाल्या समजून घेऊन आपल्या प्रणालीत अनुरूप बदल करून न पकडले जाता त्या लक्ष्याला कुचकामी बनवू शकते. हा कल्पनाविलास न राहता प्रत्यक्षात घडत आहे.

आयबीएमच्या शास्त्रज्ञांनी प्रायोगिक तत्त्वावर विकसित केलेली कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त सुरक्षाभेदक प्रणाली, ‘डीप लॉकर’ तेच करते. ती सामान्य विदा म्हणून लक्ष्य संस्थेच्या जालावर पाठवली जाते, आणि जोपर्यंत इच्छित लक्ष्य गाठले जात नाही, तोपर्यंत कूटबद्ध केलेली तिची प्रणाली प्रकट करत नाही.

Artificial intelligence is hard to avoid Bhushan Kelkar
आता कृत्रिम बुद्धिमत्तेला टाळणे कठीण डॉ. भूषण केळकर
Weather forecasting and artificial intelligence models
कुतूहल: हवामानाचा अंदाज व कृत्रिम बुद्धिमत्ता प्रारूपे
loksatta kutuhal evaluation of artificial intelligence
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेने मूल्यमापन
Loksatta kutuhal Artificial Intelligence in Education
कुतूहल: शिक्षणक्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता
Kutuhal Artificial intelligence and surgery
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शस्त्रक्रिया
Loksatta kutuhal Artificial intelligence and health research
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आरोग्यविषयक संशोधन
loksatta kutuhal artificial intelligence for medical diagnostics
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोगनिदान चाचण्या
Loksatta kutuhal Artificial intelligence and early diagnosis
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्राथमिक रोगनिदान

सोबतच्या चित्रात एका संस्थेचे माहितीजाल दाखविले आहे. शर्विलकांची कूटप्रणाली या जाळ्यात अशी शिताफीने फिरते की तिचे अंतिम लक्ष्य असलेल्या संगणक किंवा विशिष्ट संगणक जालालाही ते कळत नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारी कूटप्रणाली सुरक्षा प्रणालींना चकवून विशिष्ट लक्ष्यावर हल्ला करते.

अशा कूटप्रणालीयुक्त हल्ल्याचा सामना कसा करायचा, कारण हल्ला कुठून आणि कसा होणार हे माहीतच नसेल तर, कुठे कुठे म्हणून सुरक्षा बळकट करावी? त्या संदर्भात खबरदारी घेणे हाच मंत्र आहे. पुढील काळजी घेता येऊ शकते… १) आपले मौलिक दस्तऐवज (क्रिटिकल असेट्स) ओळखून त्यांच्यासाठी खास सुरक्षा प्रणाली ठेवणे, २) सर्व प्रणाल्या म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम, अॅप्स आणि अँटीव्हायरस प्रणाल्या अद्यायावत ठेवणे आणि ३) सर्व सुरक्षा प्रणाल्यांवर २४ तास नजर ठेवणे. एखादी नेहमीपेक्षा थोडी वेगळी घटना आढळल्यास तिचा त्वरित परामर्श घेणे आणि जर ती जास्त घातक वाटली तर, वरिष्ठ व्यवस्थापनाला कळवून उपयोजित प्रतिकाराची व्यवस्था करणे.