ग्रंथालयातील संग्रहित महत्त्वाचे साहित्य जसे की हस्तलिखिते, दुर्मीळ व जुनी पुस्तके, वृत्तपत्रातील कात्रणे तसेच जुन्या नोंदवह्या आणि ग्रंथालय समिती सभांचे इतिवृत्त हा ऐतिहासिक ठेवा होत जातो. तरी भविष्यासाठी त्याचे जतन करणे कळीचे आहे. स्कॅनिंगची प्रक्रिया करून अशा साहित्याचे अंकीकरण करणे हे जवळपास अनिवार्य झाले आहे. मात्र ते केवळ इलेक्ट्रॉनिक झेरॉक्सिंग मानले जाऊ नये. ती अतिशय सखोल प्रक्रिया असून तिच्यासोबत अनेक मूल्यवर्धन करणाऱ्या लाभदायी बाबींचा समावेश करणे अपेक्षित असते. असा अंकीय संग्रह (डेटाबेस) एकसंध (सीमलेस) असेल हे बघितले पाहिजे. त्यामुळे संग्रहाचा शोध विविध प्रकारे करता येणे, सध्याच्या भ्रमणध्वनीपासून ते आगामी अंकीय साधनांनी संग्रहाचा सुबकपणे वापर शक्य होणे आणि गरज भासल्यास कुठल्याही दस्तावेजाच्या स्वच्छ प्रती काढता येणे, अशा दूरगामी उपयोगाच्या व्यवस्था या अंकीकरण प्रक्रियेत समाविष्ट केल्या गेल्या पाहिजेत.

हेही वाचा >>> कुतूहल: ग्रंथालयात कृत्रिम बुद्धिमत्ता : वर्गीकरण, यांत्रिक हात!

viagra tablet for dimensia
लैंगिक शक्ती वाढवणारी व्हायग्रा मेंदूसाठी ठरणार फायदेशीर? काय सांगतंय नवीन संशोधन?
Mumbai Metro faces financial crisis
विश्लेषण : ‘एमएमआरडीए’ आर्थिक संकटात कशी?
Why a snake researcher stepped on vipers 40 000 times Joao Miguel Alves-Nunes
संशोधकाने सापांवर चाळीस हजार वेळा पाय का दिला? निष्कर्ष काय?
structural audit of bridges and dangerous buildings
धोकादायक इमारतींसह पुलांचे संरचनात्मक लेखापरीक्षण – आपत्ती प्राधिकरण यंत्रणेची सूचना
Loksatta kutuhal Artificial Intelligence in Cyber crime
कुतूहल: सायबर गुन्ह्यांतील कृत्रिम बुद्धिमत्ता
article about upsc exam preparation guidance
UPSC ची तयारी : मुख्य परीक्षा: इतिहास
ICMR slammed Covaxin side effects study Banaras Hindu University
कोवॅक्सिनच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न विचारणारे संशोधन ICMR ने का धुडकावून लावले?
Loksatta kutuhal Cyber Crime and Artificial Intelligence
कुतूहल: सायबर गुन्हे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता

अशा महाकाय माहितीसाठ्याचे (बिग डेटा) सखोल विश्लेषण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची प्रगत साधने वापरणे गरजेचे होते आहे. उदाहरणार्थ, डेटा मायनिंग, टेक्स्ट मायनिंग आणि वेब मायनिंग अशी ती साधने असू शकतात. त्यामुळे सामान्य विश्लेषणाने प्राप्त न होऊ शकणारे निष्कर्ष काढता येतात. मशीन लर्निंग पद्धतीने कार्यरत असलेली ग्रंथालयातील अशी नवी प्रणाली कुठल्याही संदर्भात विचारलेल्या प्रश्नाचे समर्पक उत्तर देते. त्याच्याशी निगडित ग्रंथालयातील सर्व साहित्याची जंत्री देऊ शकते. त्यापलीकडे जाऊन निवडक साहित्याचा अनुवाद, चित्रे आणि श्राव्य स्वरूपात साहित्यदेखील पुरवू शकते. ग्रंथालयात अशी ‘तज्ज्ञ प्रणाली’ (एक्स्पर्ट सिस्टीम) असणे काळाची गरज होत आहे.

हेही वाचा >>> कुतूहल: ‘असे’ही सायबर हल्ले होऊ शकतात..

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे पडद्याआड गेलेल्या स्मृती ताज्या करून चपखलपणे वापरण्याची उदाहरणे पुढे येत आहेत. यासाठी खास ‘प्रतिनिधी तंत्रज्ञान’ (एजन्ट टेक्नॉलोजी) प्रणाली विकसित केली गेली आहे. तिचा वापर करून मृत व्यक्तीचा ‘प्रतिनिधी’ तयार केला जातो. तो प्रगत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विविध पैलूंच्या मदतीने हुबेहूब मूळ व्यक्तीच्या विचारसरणीनुसार सध्याच्या प्रश्नांवर, घडामोडींवर आपले मत तयार करेल आणि ते त्याच्याच आवाजात आणि लकबीत मांडेल. अनेक गत कलाकारांचे संवाद, गाणी आणि अभिनय याप्रकारे चित्रपटांत सादर केले जात आहेत. न्यायालयात अशा अवताराने साक्ष देणे अशी नाटकीय घटना ऑस्ट्रेलियात अलीकडेच घडली आहे. विशेष म्हणजे हे ग्रंथालयात संग्रहित आणि अंकीकरण केलेल्या साहित्याचा वापर करून केले गेले. प्रतिनिधी तंत्रज्ञान मानवी व्यवहाराला इतिहासाशी जोडून एक वेगळी दिशा देणारे ठरेल.

– डॉ. विवेक पाटकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

सकेंतस्थळ : http://www.mavipa.org