कृत्रिम बुद्धिमत्तेच्या किमयेची दखल विज्ञानकथाकारांनी केव्हापासून घ्यायला सुरुवात केली याविषयी मतभेद असले तरी अनेक समीक्षक मेरी शेलीच्या फ्रॅन्केन्स्टाईन या आद्य विज्ञानकथेला ते श्रेय देतात. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ही कथा लिहिली गेली होती. त्यावेळी संगणकाच्या संकल्पनेनंही वैज्ञानिक क्षेत्रात पाऊल ठेवलं नव्हतं. संगणकाधिष्ठित  स्वयंभू यंत्राची बाब तर दूरच राहिली. त्यामुळं त्या संकल्पनेचा तसा स्पष्ट आविष्कार त्या कथेत दिसत नसला तरी एका डॉक्टरनं तयार केलेला एक यंत्रमानव अशी काहीशी धूसर कल्पना त्यात समाविष्ट आहे. मूळ उद्दिष्टाला हरताळ फासत फ्रॅन्केन्स्टाईन आपल्याच करवित्याच्या मस्तकावर हात ठेवत त्याला भस्मसात करणाऱ्या भस्मासुरासारखा वागू लागतो याचं प्रत्ययकारी चित्रण त्या कथेत निश्चितच आहे. आपल्या हातून होणाऱ्या संशोधनाचा परिणाम आपल्या हाती नसण्याची शक्यताच त्या कथेनं अधोरेखित केली आहे. त्या भविष्यवेधी कल्पनेचं प्रक्षेपण आज कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अशाच विघातक उपयोजनेविषयीच्या आशंकेत प्रतिबिंबित झालं आहे.

हेही वाचा >>> कुतूहल : सुष्ट की दुष्ट

This is what happens when you chew cloves everyday
रोज एक-दोन लवंग चघळल्या तर शरीरावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर…
upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…

ही अर्थात या तंत्रज्ञानाची काळीकुट्ट, पण एकच, एकमेव नव्हे, बाजू झाली. त्या तंत्रज्ञानाचा विधायक उपयोग होऊ शकतो हे दर्शवणाऱ्या विज्ञानकथांचं लेखन त्यानंतर ज्याला विज्ञानकथांचा सुवर्णकाळ मानलं गेलं आहे त्या कालखंडात झाला आहे. त्याचं सर्वात ठळक उदाहरण आयझॅक अँसिमॉव्हच्या फॅन्टॅस्टिक व्हॉयेज या विज्ञानकादंबरीमध्ये आढळतं. आजच्या ड्रोनची आठवण करून देणारा एक सूक्ष्म रोबोट, यंत्रमानव धमनीद्वारे शरीरात सोडून दिल्यानंतर तो सर्वत्र स्वयंचलितरीत्या संचार करत निरनिराळ्या अवयवांची ते कार्यरत असतानाच जवळून तपासणी करतो, तिचा अहवाल उपचार करणाऱ्या डॉक्टरला कळवतो आणि त्याच्या सूचनांनुसार, तर काही वेळा स्वतंत्रपणेही, योग्य ते उपाय योजून त्या नाठाळ अवयवाला ताळ्यावर आणतो, अशी कल्पना त्या कथेमध्ये केलेली आहे. तिचाच एक दुसरा अवतार अँसिमॉव्हनं त्याच कादंबरीच्या सिक्वेलमध्ये सादर केला होता. एरवी मेंदू आणि शरीर यामधील प्रतिबंधात्मक कुंपण भेदणं शक्य नसतं. मेंदूमध्ये झालेल्या बिघाडाची चिकित्सा आणि तिचा बंदोबस्त करण्यासाठी तयार केलेला बॉट करतो, अशी कल्पना त्या विज्ञानकथेत मांडली गेली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संकल्पनेचा उगम होण्यापूर्वीच्या या विज्ञानकथा आहेत. त्या भविष्यदर्शी आहेत. विज्ञानकथा आपल्याला भविष्यात उद्भवू शकणाऱ्या समस्यांचा सामना करण्यासाठी सावध तर करतेच पण त्यांच्यावर मात करण्यासाठी उद्युक्त करते हेच या विज्ञानकथांनी दाखवून दिलं आहे.

– डॉ. बाळ फोंडके

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org