अलीकडेच समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ प्रसारित करण्यात आला होता. त्यात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या एका साधनाच्या मदतीनं तयार केलेल्या आपल्याच डिजिटल ट्विनबरोबर खासदार शशी थारूर गप्पा मारत असल्याचं दाखवलं होतं. अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीचा आभासी जुळा बनवणं हे आता विज्ञानकथेच्या प्रांगणातून प्रत्यक्षात उतरल्याचं स्पष्टच झालं होतं. पण विज्ञानकथांमध्ये त्याचं चित्रण गेल्या काही वर्षांपासून होत आहे. मराठीतील विज्ञानकथाही यात मागे नाहीत.

उज्ज्वल राणे यांनी ‘शिवोऽहम् शिवोऽहम्’ या कथेमध्ये या संकल्पनेचा चतुराईनं उपयोग करत एक रोमांचकारी विज्ञानकथा लिहिली आहे. डॉ. बाळ फोंडके यांनीही आपल्या ‘इकडे आड तिकडे विहीर’ ही कथा याच कल्पनेवर फुलवली आहे. चॅट जीपीटीचा वापर करून एखाद्या लेखकाच्या शैलीत कथा किंवा लेख लिहून तो त्याचाच असल्याचं दाखवत मूळ लेखकाला त्याच्या स्वामित्व हक्कापासून वंचित ठेवणारी विज्ञानकथा ‘पंचाहत्तरावी कादंबरी’ डॉ. बाळ फोंडके यांनी लिहिली आहे.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…

डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर तर आजकाल सायबर गुन्ह्यांसाठी सर्रास होत आहे, पण विज्ञानकथांमध्ये त्याला दहा-बारा वर्षांपूर्वीच स्थान मिळालेलं आहे. सुबोध जावडेकरांची ‘चक्षुर्वै सत्यम’ हे याचं उत्तम उदाहरण आहे. फोंडकेंनीसुद्धा आपल्या ‘पर्दाफाश’ या कथेत अशाच एका सायबर गुन्ह्याचा उलगडा करून दाखवला आहे. मेघश्री दळवीही यात मागे नाहीत. त्यांच्या ‘जाल’ आणि ‘दिवस सातवा?’ या कथाही कृत्रिम बुद्धिमत्तेपायी उद्भवणाऱ्या घटनांवर आधारित आहेत.

पाश्चात्त्य कथांमध्ये आर्थर क्लार्कच्या अतिशय गाजलेल्या ‘२००१, ए स्पेस ओडिसी’ या कथेत एचएएल ९००० नावाच्या संगणकाने प्रथम आपलं अस्तित्व दाखवलं. त्या कथेवर स्टॅन्ले क्युब्रिक यांनी ब्लॉकबस्टर चित्रपटाचीही निर्मिती केली होती. त्यात हा संगणक एक यंत्र न राहता एखाद्या माणसासारखा वागतो अशी कल्पना होती. आज ती प्रत्यक्षात येत असल्याचं दिसून येत आहे.

विज्ञानकथांमधल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या कल्पित आविष्कारापायीच त्या तंत्रज्ञानाच्या खऱ्याखुऱ्या सामर्थ्यांची जाणीव हळूहळू विज्ञान संशोधकांना होऊ लागली. खासकरून स्टीफन हॉकिंग यांनी त्याची दखल घेतल्यानंतर त्या तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना मिळाली. आज ते सर्वव्यापी होत आहे. 

डॉ. बाळ फोंडके , मराठी विज्ञान परिषद