माणसापेक्षाही श्रेष्ठ परिपूर्ण बुद्धिमत्ता प्रत्यक्षात आणण्यासाठी तंत्रज्ञानात संशोधन सुरू आहे. माणसाचे अनुकरण करत आणखी वरची पातळी गाठायचा प्रयत्न त्यात आहे. नैसर्गिक भाषा वापरणारी चॅटजीपीटीसारखी लार्ज लँग्वेज मॉडेल्स झपाटय़ाने सुधारत आहेत. एकाच वेळी दृकश्राव्य, मजकूर आणि इतर प्रकारची माहिती समर्थपणे हाताळू शकणाऱ्या मल्टीमोडल बुद्धिमान प्रणाली येत आहेत.

कृत्रिम बुद्धिमत्ता मिळालेल्या माहितीवरून भविष्यातले अंदाज वर्तवू शकते (प्रेडिक्टिव्ह). परिणाम आणि त्यामागील कार्यकारण उमजून घटनांमागची कारणे निश्चित करू शकते (कॉझल) आणि उपलब्ध माहितीच्या आधारे नवीन काही निर्माण करू शकते (जनरेटिव्ह). आज या तिन्हीसाठी बहुतेक वेळा आपण वेगवेगळय़ा प्रणाली वापरतो. हायपरमोडल बुद्धिमान प्रणालीमध्ये या तिन्ही क्षमता असतात. स्वयंचलित यंत्रणांमध्ये वापरण्यासाठी हायपरमोडल प्रणालीवर वेगाने संशोधन सुरू आहे. त्यातून मानवी बुद्धिमत्तेच्या कित्येक पटींनी पुढे जाणे शक्य आहे. माहिती, अनुभव आणि संदर्भावरून शिकणाऱ्या मशीन लर्निग तंत्रज्ञानाचा अनेक बुद्धिमान प्रणालींमध्ये वापर होतो. पण माणूस आजपावेतो अनेकदा चुकतमाकत शिकला आहे. अमुक केल्यास फायदा आणि तमुक केल्यास नुकसान किंवा शिक्षा, या धर्तीचे शिक्षण अधिक पक्के होते. त्याला सामाजिक, नैतिक, कायदेशीर नियमांचा भक्कम पाया मिळतो. एकदा झालेली चूक सहसा पुन्हा होत नाही. त्यामुळे या प्रकारच्या डीप रिएन्फोर्समेंट लर्निगने बुद्धिमान प्रणाली माणसाच्या अधिकाधिक जवळ आणि मग त्याही पलीकडे जातील असा एक विचार आहे. 

Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान
It is necessary to change the mentality with effort to make the work perfect
जिंकावे नि जगावेही : मी ‘परिपूर्ण’…?

मानवी मेंदूप्रमाणे अनेक गोष्टी समजून त्यांचा संबंध लावू शकणारे न्यूरल नेटवर्क आज वापरात आहे. न्यूरोमॉर्फिक कम्प्युटिंग त्यापुढे जाते. मेंदू आणि मज्जासंस्थेतील संदेशवहनाचे ते अनुकरण करू शकते. हे तंत्रज्ञान वापरणाऱ्या यंत्रणा काम करता करता शिकतात आणि ते तात्काळ उपयोगात आणतात. होल ब्रेन इम्युलेशन तंत्रज्ञानात मेंदूची डिजिटल प्रतिकृती तयार करता येते. मानवी मेंदूच्या रचनेचे मज्जातंतूसहित आरेखन करू शकणाऱ्या या प्रक्रियेला माइंड अपलोिडग असेही म्हणतात. या तंत्रांचा वापर परिपूर्ण बुद्धिमत्तेसाठी करता येईल. 

इव्होल्युशनरी अल्गोरिदम हे आणखी एक आगळे तंत्रज्ञान. त्यात डार्विनच्या उत्क्रांतीवादाचा आणि नैसर्गिक निवडीचा आधार घेऊन प्रणाली सतत सुधारत जाईल अशी प्रक्रिया असते. सजीवांच्या दीर्घकालीन उत्क्रांतीचे अनुकरण करणे हे काम अर्थातच सोपे नाही. तरीही अशी आव्हाने संशोधक स्वीकारत आहेत. त्यातून परिपूर्ण बुद्धिमत्तेकडे वाटचाल होऊ शकते.    

डॉ. मेघश्री दळवी