संस्थानांची बखर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्य़ात असलेले मुधोळ हे ब्रिटिश राजमध्ये नऊ तोफांच्या सलामीचा मान असलेले संस्थान होते. साधारणत: १३०० साली चितोडच्या राणाचे वंशज मुधोळ येथे स्थलांतरित झाले. त्यांच्यापकी राणा भरवजी ऊर्फ बोसाजी यास मुधोळची जहागिरी मिळाली. त्याचा वंशज उग्रसेन याने भोसले हे उपनाव घेतले. सातारा, कोल्हापूर, नागपूर, तंजावर येथील राज्यकत्रे आणि मुधोळचे भोसले एकाच वंशाचे. पुढे राजे भीमसिंग यांना इ.स. १४७० मध्ये घोरपडे हा खिताब मिळाल्यावर पुढील पिढय़ांनी घोरपडे हेच उपनाव लावले. चोलराज घोरपडे (१५६५-१५७८) याला विजयनगरची सात हजारी मनसबदारी आणि २६ गावे इनामात मिळाली. बाजी घोरपडे हा आदिलशहाकडे नोकरीस असताना शहाजी भोसले यांना पकडण्याची कामगिरी बाजीने मुस्तफाच्या मदतीने पार पाडली. इथपावेतो जहागीर म्हणून अस्तित्व असलेले मुधोळ मालोजीराव घोरपडे (कारकीर्द १६६६ ते १७००) यांच्या काळात एक स्वतंत्र राज्य म्हणून उदयाला आले. मालोजीराव घोरपडे विजापूरच्या आदिलशहाकडे प्रमुख सेनानी म्हणून नोकरीत होते. मिर्झाराजे जयसिंहाने विजापूरवर हल्ला केला तेव्हा मालोजीरावांनी केलेल्या कामगिरीबद्दल आदिलशहाने त्यांना पाच महालांचे राजेपद आणि सात हजारी पायदळाची मनसबदारी दिली. मालोजीरावांचा पणतू मालोजीराव घोरपडे द्वितीय याचा पेशव्यांशी स्नेह होता. त्यांनी त्याची जहागिरी आणि मुधोळच्या राज्यास मान्यता दिली. पुढे त्याचा मुलगा व्यंकटराव याने १८१९ मध्ये कंपनी सरकारचे आधिपत्य स्वीकारल्यामुळे मुधोळ हे ब्रिटिशअंकित संस्थान बनले. राजे भरवसिंह घोरपडे द्वितीय हे मुधोळ संस्थानाचे अखेरचे राजे. त्यांनी मुधोळ संस्थान स्वतंत्र भारतात विलीन केले.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mudhol presidency
First published on: 12-10-2015 at 01:50 IST