आपल्या घरात चिंच, वाल, भोपळा, पारिजातक, गोकर्ण वगरेंच्या बिया पडलेल्या असतात. त्यांना वर्षांनुवष्रे अंकुर फुटत नाही. परंतु त्या झाडांचे सर्व आनुवंशिक गुणधर्म त्या बियांत, डीएनए, जनुके वगरे आनुवंशिक तत्त्वाच्या घटकांच्या स्वरूपात संकेतावस्थेत बंदिस्त असतात. त्या झाडाचे खोड म्हणजे बुंधा कसा असावा; पाने, फुले, फळे कशी असावीत, झाडाची उंची किती असावी, झाडाचा आकार कसा असावा, फांद्या कशा असाव्यात, विस्तार कसा असावा, फुले केव्हा यावीत, फुलांचा आकार कसा असावा, पाकळ्यांचा आकार कसा असावा, त्यावर रंग कोणकोणते असावेत, ठिपके आणि रेषा वगरे कुठे आणि कोणत्या रंगांचे असावेत, सुवास कोणता आणि किती असावा, सारे सारे त्या बीमध्ये अगदी लहानसहान बारकाव्यासहित बंदिस्त केलेले असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे सर्व संकेत, निसर्गाच्या भाषेत, आज्ञावलीच्या स्वरूपात म्हणजे आनुवंशिक तत्त्वाच्या स्वरूपात या बियांत बंदिस्त असतात. जोपर्यंत आपण या बिया जमिनीत पेरत नाही आणि थोडे पाणी, सूर्यकिरणांची उष्णता आणि वातावरणातील ऑक्सिजन या सर्व बाबी एकाच वेळी त्या बियांना मिळत नाहीत तोपर्यंत त्यांना अंकुर फुटत नाहीत.

पण एकदा का, त्या बिया चांगल्या सुपीक जमिनीत पेरल्या, त्यास दररोज थोडे पाणी घातले, त्या जागेवर चांगला सूर्यप्रकाश पडू दिला, हवा मिळू दिली तर चार-पाच दिवसांत अशी कोणती नवी नवलाई घडते की, त्या बियांत अचानक जागृतावस्था येऊन आनुवंशिक तत्त्वाच्या स्वरूपात बंदिस्त असलेले संकेत उलगडायला लागतात, बंदिस्त आज्ञावली कार्यान्वित होते आणि त्या बियांना फोडून बाहेर आलेला अंकुर वाढू लागतो, झाडाचा जन्म होतो, त्या अंकुराचा एक भाग, मूळ म्हणून जमिनीखाली वाढू लागतो आणि एक भाग खोड आणि पाने या स्वरूपात जमिनीच्या पृष्ठभागावर वाढू लागतो. याचा अर्थ असा की, बियांत बंदिस्त असलेले आनुवंशिक संकेत उलगडायला लागण्याची प्रक्रिया सुरू झाली, सांकेतिक आज्ञावली कार्यान्वित झाली, म्हणजे झाडाचा जन्म झाला असे म्हणता येईल.

डॉ. गजानन वामनाचार्य

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

ताश्कंदचा टीव्हीसंशोधक ग्राबोवस्की

बोरिस पावलोविच ग्राबोवस्की या सोव्हिएत तंत्रज्ञाने जगातील पहिला पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक तंत्रावर आधारलेला टीव्ही संच बनवला. ‘कॅथोड कम्युटेटर’ असे त्यांनी नाव दिलेल्या यंत्राच्या साह्यने त्यांनी या प्रात्यक्षिकात, हात आणि डोक्याची हालचाल, तसेच चालणाऱ्या  ट्रमचे प्रक्षेपण करून दुसऱ्या  ठिकाणी प्रदíशत केले. बोरिसचे वडील एका क्रांतिकारी गटाचे क्रियाशील कार्यकत्रे असल्यामुळे झार राजवटीने त्यांना अटक करून सबेरियात हद्दपार केले  होते. १९०१ साली सबेरियातच टोनोलस येथे बोरिस ग्राबोवस्कीचा जन्म झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर बोरिसची आई आपल्या मुलांना घेऊन ताश्कंद जवळच्या गावात स्थायिक झाली. बोरिसचे शिक्षण ताश्कंदच्या शाळेत झाल्यावर त्याचे पुढील शिक्षण सेंट्रल एशियन युनिव्हर्सटिीत झाले. युनिव्हर्सटिीत शिकत असताना बोरिसने प्रा. बोरिस रोिझग यांची ‘इलेक्ट्रॉनिक टेलिस्कोपी’ या विषयावरची पुस्तके आणि लेख वाचून प्रभावित होऊन पुढे याच विषयावरचं संशोधन करण्याचे ठरवले.

एखाद्या वस्तूची प्रतिमा प्रक्षेपित करून दूर अंतरावर ती जशीच्या तशी पहायची या कल्पनेने बोरिस एवढा भारावून गेला की, आपले सहकारी निकोलाय पिस्कनोव्ह आणि  प्रा. घोपोव्ह  यांच्याबरोबर  रात्रंदिवस प्रयोगशाळेत गढून गेला. अनेक प्रयोग केल्यावर अखेरीस त्याला ‘कॅथोड कम्युटेटर’ म्हणजे प्रक्षेपणाचे प्राथमिक यंत्र बनविण्यात यश आले. बोरिसने आपल्या या पहिल्या पूर्ण इलेक्ट्रॉनिक टीव्ही संचाचे प्रात्यक्षिक ताश्कंदमध्ये तंत्रज्ञांची समिती आणि नागरिकांपुढे १९२८  साली दाखविले. बोरिसने इलेक्ट्रॉनिक्स या विषयाचे आपले मार्गदर्शक  बोरिस रोजिंग यांच्या सूचनेप्रमाणे आपल्या या संशोधनाचे पेटंट (क्रमांक ५५९२) घेतले. आपल्या या टीव्ही संचाचे नाव बोरीसनी ‘टेलिकोट’ असे ठेवले. या संशोधनाबद्दल सोव्हिएत युनियनने बोरिसला १९६४ साली ‘ऑनरेबल इन्व्हेंटर ऑफ द यूएसएसआर’ हा सन्माननीय किताब दिला. १९६६ मध्ये बोरिसचा मृत्यू झाला.

बोरिसच्या पूर्वी आपण हे संशोधन केल्याचा दावा केंजीरो टाकायानागी-जपान, चार्ल्स फ्रान्सिस जेकिन्स-अमेरिका, कॅलमन निहान्थी- हंगेरी आणि फिलो फाम्सवर्थ- अमेरिका यांनी केला खरा; परंतु बोरिसच्या टिव्ही संचाचा तांत्रिक दर्जा अधिक वरचा होता असे जाणकारांनी मान्य केले आहे.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Plant origin
First published on: 27-12-2016 at 03:42 IST