किनारपट्टी परिसरात मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी पाणी साचले

पालघर :  पावसाने सोमवार मध्यरात्रीपासून जिल्ह्यच्या किनारपट्टीच्या तालुक्यांना अक्षरश: झोडपून काढले. मध्यरात्री सुरू झालेला मुसळधार पाऊस रात्रभर कोसळत राहिल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले.

सोमवारी दिवसभरात पावसाच्या काही सरी कोसळल्या. मध्यरात्रीनंतर पावसाने दमदार पुनरागमन केले.  किनारपट्टीच्या तालुक्यांमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत होता.  सकाळी अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते. सकाळी नऊ वाजल्यानंतर पावसाचा वेग मंदावला. रात्रीच्या आठ-दहा तासांत पालघर तालुक्यात बोईसर मंडळ क्षेत्रात १३६ मिलिमीटर, पालघर   १३५, आगरवाडी १२५, तारापूर १२३ तर सफाळे मंडळ क्षेत्रात १२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.  डहाणू मंडळ क्षेत्रात १५१ तर मल्याण व चिंचणी मंडळ क्षेत्रात प्रत्येकी ११५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. वाडा तालुक्यात कोन मंडळ क्षेत्रात ७६ मिलिमीटर, वाडा ७२ मिलिमीटर, कंचाड ६४ तर कुडूस येथे ५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.   तलासरी  ५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. दुपापर्यंत  जनजीवन पूर्वपदावर आले.

बोर्डी परिसरात १०० घरात पाणी शिरले

डहाणू : बोर्डी, घोलवड, चिखले येथील सखल भागातील वस्त्या, पाडय़ातील सुमारे १०० हून अधिक घरांमध्ये पाणी भरल्याने पूरपरिस्थितीचा सामना रहिवाशांना करावा लागला. बोर्डी येथील धुंडीयापाडा, बाभुळ तलाव, मरवड या ठिकाणी प्रभारी पोलीस अधिकारी रवींद्र पाखरे, ग्रामस्थ यांनी प्रत्यक्षात जाऊन तेथील १०० हून अधिक लोकांना विश्राम धाम, कॅम्पिंग ग्राऊंडशेजारी, बोर्डी येथे सुरक्षित स्थळी स्थलातंरित केले. यामध्ये ४५ वृद्ध इसम व लहान मुलांचा समावेश आहे. सदर स्थलांतरित लोकांना फूड पॅकेट, बिस्किट, स्वच्छ पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले आहे.

तीन तरुणांना वाचवले

झाई खाडीमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊन त्यामध्ये ३ तरुण वाहून जात होते. घोलवड पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने स्वत:चा जीव धोक्यात घालून त्या तीन तरुणांना खाडीतुन बाहेर काढले आहे. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास तात्काळ उमरगांव येथील रुग्णालयामध्ये पुढील उपचाराकामी दाखल करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दखल घेत प्रभारी अधिकारी रवींद्र पाखरे यांना बक्षीस जाहीर केले आहे.

नदीला पूर

कैनाड नदीला महापूर आल्याने डहाणू शहारातील कंक्राटी, घाचीया नदीला पूर आला. डहाणू शहरातील इराणी रोड, जलाराम मंदिर, परिसरात रस्त्यावरून पाणी वाहू लागले. तर अनेक घरात पाणी शिरून जंगम मालमत्तेचे नुकसान झाले. डहाणू बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावरून पाणी वाहू लागल्याने  बाजारपेठेत पाणी शिरले. कंक्राटी खाडी भरल्याने रेल्वे पूलाखालची वाहतूक ठप्प झाली, तर बोर्डी, चिखला, झाई, वेवजी, या भागातील रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद होती. दुपारी पाऊस कमी झाल्यनंतर वाहतूक सुरळीत झाली.

२४ तासांतील पाऊस मिलिमीटरमध्ये

  • वसई: ८६.५
  • जव्हार: १२.००
  • विक्रमगड: १०.००
  • मोखाडा: १५.४०
  • वाडा: ६७.००
  • डहाणू: ८८.९२
  • पालघर: ११०.५०
  • तलासरी: ३८.६

एकूण सरासरी: ५३.६२

डहाणू, तलासरीत जनजीवन विस्कळीत

कासा : मुसळधार पावसात डहाणू शहर आणि परिसर जलमय झाला. डहाणू शहरातील अनेक सखल भागात मोठय़ा प्रमाणात पाणी साचले होते.  तर अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले होते.  एसटी बसस्थानक जलमय झाल्याने बस रस्त्यावर उभे करण्याची वेळ प्रशासनावर आली. अनेक निवासी वसाहतीच्या तळाला मोठय़ा प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले. किनारपट्टी भागातील डहाणू, घोलवड, बोर्डी या भागात पावसाचे प्रमाण सर्वाधिक होते.  मुसळधार पावसामुळे डहाणू बोर्डी रस्त्यावरील अनेक छोटे पूल पाण्याखाली गेल्यामुळे  या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. तलासरी, उमरगाव परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्त्यावरील वाहतूक बंद पडली होती.

बोर्डी परिसरात १०० घरांत पाणी

डहाणू : बोर्डी, घोलवड, चिखले येथील सखल भागातील वस्त्या, पाडय़ातील सुमारे १०० हून अधिक घरांमध्ये पाणी भरल्याने पूरपरिस्थितीचा सामना रहिवाशांना करावा लागला. बोर्डी येथील धुंडीयापाडा, बाभुळ तलाव, मरवड या ठिकाणी प्रभारी पोलीस अधिकारी रवींद्र पाखरे, ग्रामस्थ यांनी प्रत्यक्षात जाऊन तेथील १०० हून अधिक लोकांना विश्राम धाम, कॅम्पिंग ग्राऊंडशेजारी, बोर्डी येथे सुरक्षित स्थळी स्थलातंरित केले. यामध्ये ४५ वृद्ध इसम व लहान मुलांचा समावेश आहे. सदर स्थलांतरित लोकांना फूड पॅकेट, बिस्किट, स्वच्छ पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले आहे.

तीन तरुणांची सुटका

झाई खाडीमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊन त्यामध्ये ३ तरुण वाहून जात होते. घोलवड पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने स्वत:चा जीव धोक्यात घालून त्या तीन तरुणांना खाडीतुन बाहेर काढले आहे. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास तात्काळ उमरगांव येथील रुग्णालयामध्ये पुढील उपचाराकामी दाखल करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दखल घेत प्रभारी अधिकारी रवींद्र पाखरे यांना बक्षीस जाहीर केले आहे.

कैनाड नदीला महापूर