पालघर : पालघर महावितरण विभागामधील सुमारे २७ टक्के वीज मीटर बदलण्याचे काम पूर्ण झाले असून मीटरही कार्यान्वित झाले आहेत. यामुळे वीज वापराचे मीटर र्रींडग घेण्यात सुलभता व अचूकता येणार असल्याचा दावा महावितरण कंपनीने केला आहे. महावितरण कंपनी अंतर्गत कोकण क्षेत्र, भांडूप व कल्याण विभाग येतो. येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी ठेका देण्यात आला आहे. घरगुती, वाणिज्य वीज ग्राहकांकडून होणाºया विजेचा वापर नोंदवण्यासाठी वापरात असणाºया जुन्या मीटरना बदलून त्या ऐवजी सिमकार्ड असणारे स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत. यासाठी महावितरण कंपनीने तीन परिमंडळ क्षेत्रात ७५९४ कोटी रुपयांचा ठेका दिला आहे.

यामध्ये जुने वीज मीटर काढून त्याजागी जीनियस, सिक्युअर व एसपीएल कंपनीचे स्मार्ट मीटर बसवण्याचे अंतर्भूत आहे. कोकण विभागात सुमारे ३५ लाखपेक्षा अधिक स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. पालघर महावितरण विभागांमध्ये ४.४४ लाख वीज ग्राहक आहेत. सुमारे एक लाख २० हजार स्मार्ट मीटर बसवण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली. पालघर महावितरण विभागाअंतर्गत नऊ उपविभागात ११ पथकांमार्फत स्मार्ट मीटर बदलण्याचे काम सुरु आहे.पहिल्या टप्प्यात शासकीय कार्यालय, तसेच बंद असणारे मीटर बदलण्याकडे प्राधान्य दिले आहे. टप्प्याटप्प्याने सर्व घरगुती व वाणिज्य ठिकाणी जुने मीटर काढून तेथे स्मार्ट मीटर बसवण्यात येतील, असे असे महावितरण कंपनीच्या अधिकाºयांकडून सांगण्यात आले

काही ठिकाणी ग्राहकांचा विरोध

स्मार्ट मीटर बसवण्यास काही ठिकाणी ग्राहकांनी विरोध दर्शवला आहे. मीटर बदलण्याबाबत झालेल्या महावितरण कंपनीच्या निर्णयाबाबत सर्वसामान्य ग्राहकांना आवश्यक माहिती नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येते. काही ठिकाणी मीटरमध्ये छेडछाड करून वीज वापराची मात्रा कमी करण्यात येते, अशाप्रकारे वीज चोरीचे प्रयत्न असफल होत असल्याचे काही ग्राहकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या स्मार्ट मीटरला आमचा विरोध असल्याचे त्यांनी सांगितले.

फायदा काय?

स्मार्ट मीटरमध्ये सिम कार्ड असल्याने दर महिन्याच्या ठराविक तारखेला स्वयंचलित पद्धतीने मीटरचे र्रींडग घेण्यात येऊ शकते. त्यामध्ये मानवी हस्तक्षेप राहणार नाही. र्रींडग घेण्यास होणारा विलंर्ब ंकवा चुका टळतील. वीज वापराचे अचूक देयके ग्राहकांना प्राप्त होईल. या स्मार्ट मीटरसोबत येणाºया मोबाइल अ‍ॅप्लिकेशनमुळे प्रत्येक दिवशी वेळेनुसार आस्थापनेत झालेल्या विजेच्या वापराचा तपशील उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विजेचा अवास्तव वापर ग्राहकाला टाळता येईल. मीटरमध्ये छेडाछेड करणे शक्य नसल्याने वीजचोर्री ंकवा अन्य प्रकार टाळले जातील.