scorecardresearch

Premium

पालघर जिल्ह्याचा ९९.४० टक्के निकाल

पालघर जिल्ह्यचाही दहावीचा निकाल  ९९.४०  टक्के लागला आहे.

पालघर जिल्ह्याचा ९९.४० टक्के निकाल

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २.६७ टक्के अधिक निकाल

पालघर: पालघर जिल्ह्यचाही दहावीचा निकाल  ९९.४०  टक्के लागला आहे. जिल्ह्यत दहावीसाठी ६१८८२ विद्यार्थ्यांंनी नोंदणी केली होती. यापैकी ६१८३९ विद्यार्थी वार्षिक मूल्यमापन परीक्षा दिल्या. यामध्ये ६१४७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ९९.४० टक्के आहे. गेल्या वर्षीच्या निकालाच्या तुलनेने या वर्षी २.६७  टक्के निकाल अधिक लागला आहे.

गेल्या वर्षी पालघर जिल्ह्यचा निकाल ९६.७३ टक्के इतका होता.  जिल्ह्यत यंदा ३० हजार ४६१ मुले तर २८ हजार नऊ मुली उत्तीर्ण झाले आहे मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९९.३० तर मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९९.५२ इतकी आहे  वाडा तालुक्यात ३११५ विद्यार्थी परीक्षेस होते. त्यापैकी तीन हजार ९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या तालुक्याची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९९.१९ इतकी आहे. मोखाडा तालुक्यात एक हजार ३६५ विद्यार्थी मूल्यमापनाच्या परीक्षेस बसले होते. त्यापैकी एक हजार ३५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होण्याची ही टक्केवारी ९९.६ इतकी आहे. विक्रमगड तालुक्यात दोन हजार ७२४ विद्यार्थी बसले. यापैकी दोन हजार ७१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले  ही उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९९.६ इतकी आहे. जव्हार तालुक्यात दोन हजार १७८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी दोन हजार १७४ विद्यार्थी विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९९.८१ एवढी आहे. तलासरी तालुक्यात चार हजार २८६ विद्यार्थी मूल्यमापनाच्या परीक्षेसाठी होते. यापैकी चार हजार २७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या तालुक्यात ९९. ६२ टक्के निकाल लागला. डहाणू तालुक्यात पाच हजार ७८६ विद्यार्थी बसले होते. यापैकी पाच हजार ७४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले ही टक्के वारी ९९.२० इतकी आहे. पालघर तालुक्यात आठ हजार ६४१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी आठ हजार ५९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पालघर तालुक्याचा निकाल  ९९.४५ टक्के आहे. वसई तालुक्यात ३३ हजार ७४३ विद्यार्थी बसले होते. या पैकी ३३ हजार ५३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या तालुक्याची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९९.३७ आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 99 40 percent result of palghar district ssc result ssh

First published on: 17-07-2021 at 00:39 IST

आजचा ई-पेपर : पालघर

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×