पालघर : तारापूर औद्योगिक उत्पादक संघटना अर्थात तारापूर इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (टीमा) च्या कार्यकारणीची बिनविरोध निवड झाली आहे.तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये १४०० उद्योग कार्यरत असून त्यापैकी ८२४ उद्योजकाने टीमा या संस्थेची सदस्यत्व स्वीकारले आहे. टीमा त्रिवार्षिक निवडणुकी मोठ्या, मध्यम व लघु उद्योगांमधून प्रत्येकी दोन तसेच सर्वसाधारण सदस्य म्हणून ११ सदस्यांची निवड करायची असते. लघु उद्योग प्रतिनिधी च्या जागांसाठी १० सदस्याने तर सर्वसाधारण जागांसाठी ३० अर्ज प्राप्त झाले होते. मात्र सर्व संबंधितांनी एकत्रितपणे येऊन ही निवडणूक बिनविरोध करून घेतली.

निवड झालेल्या कार्यकारणी सदस्यांमध्ये मोठ्या उद्योगांच्या गटामधून निलेश पाटील (आरती ड्रेस लिमिटेड), विनायक करमरकर (सियाराम सिल्क मिल्स) मध्यम उद्योगांच्या गटामधून नीरज पुरोहित (गिनी सिल्क मिल्स), अभिजीत गोले (ईमील फार्मासिटिकल्स) यांची तर लघुउद्योग गटामधून वेलजी गोगरी (अँकर केमिकल्स लिमिटेड) व एस. आर गुप्ता (सुयांसी पॉलीमर्स अँड कोटिंग्स) यांची निवड झाली आहे.

टीमा सर्वसाधारण कार्यकारणी सदस्यांमध्ये बीरेंद्र सिंग ठाकूर (ब्रीज आईस), रवींद्रचंद्र भावसार (ऍक्री ऑरगॅनिकस), देवेश देशमुख (देवेश मेटल अँड केमिकल्स), श्याम शर्मा (बीआयसी केमिकल्स अँड पॅकेजिंग), उदयन सावे (बसले केमिकल्स), डी. के राऊत (केशवा ऑरगॅनिक), अशोक नायर (मॅकॉय फार्मा), सुदेश वैद्य (इंडको जीन्स), प्रफुल त्रिवेदी (दर्शन क्रिएशन), अविनाश बियानी (उज्वल फार्मा) व मनीष संघवी यांची निवड झाल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अजित राणे यांनी घोषित केले.