दिपाली चुटके

पालघर: पालघर मनोर मार्गावरील वाघोबा खिंडीत ट्रक आणि टेम्पो मध्ये भीषण अपघात झाला असून या अपघातात एका बालकाचा जागीच मृत्यू झाला असून टेम्पो चालक गंभीर जखमी आहे.

पालघर मनोर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी वाघोबा मंदिर राजा जवळ १०-११ वाजताच्या दरम्यान वळणावर भरधाव ट्रक टेम्पोवर उलटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात टेम्पो मधील ११ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला असून टेम्पो चालक गंभीर जखमी आहे.

हेही वाचा >>>पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पालघर पोलीस स्टेशनमधून आरोपी फरार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्यात आले. मृत्यू झालेल्या बालकाला शवविच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या अपघातामुळे पालघर मनोर मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक जवळपास चार तासापेक्षा अधिक काळासाठी ठप्प झाली होती. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.