पालघर : तारापूर औद्योगिक वसाहती मधील प्लॉट नंबर डब्ल्यू ८७ मधील एका गोदामाला रात्री साडेनऊ वाजल्याच्या सुमारास आग लागली. या आगीच्या ज्वाला सुमारे वीस किलोमीटर दूरवर असलेल्या पालघर शहरामधून दिसून येत आहेत. आग लागली तेव्हा या गोदामात कोणीही कर्मचारी नव्हते असे प्राथमिक अंदाज असून शेजारच्या कंपनी मधील कामगारांनी एमआयडीसी एकदम अग्निशामक दलाला सुचित केले. औद्योगिक वसाहत अग्निशामक दलाचे तीन नंबर आग विझवण्याच्या कार्यात असल्याची माहिती देण्यात आली.

आग लागलेल्या कंपनीचे नाव हिरा पेट्रोलियम असल्याची माहिती पुढे येत आहे. या कंपनीत लाईट डिझेल ऑइल अर्थात एलडीओ सहा साठा असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कंपनीच्या लगत पेपर व प्लास्टिकचा वापर करणाऱ्या अनेक कारखाने असल्याने आग नियंत्रणात न आल्यास लगतच्या कंपन्यांना धोका संभवत आहे. पालघर चे उपविभागीय अधिकारी सुनील माळी व त्यांचे सहकारी महसूल अधिकारी घटनास्थळी पोहोचत आहेत.

municipality keeping eye after removing the encroachment on Belpada hill
पनवेल : बेलपाडा टेकडीवरील अतिक्रमण हटविल्यानंतर पालिकेची नजर
Fire at Phoenix Mall on Nagar Street pune
पुणे : नगर रस्त्यावर फिनिक्स मॉलमध्ये आग
Navi Mumbai, Escalating Traffic, traffic jam, airoli, belapur, Illegal Parking, traffic jam in Navi Mumbai, traffic jam belapur, traffic jam airoli, illegal parking in navi mumbai, marath news, two wheelar parking, four wheelar parking, navi mumbai citizens,
बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा खोळंबा, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे ऐरोलीपासून बेलापूरपर्यंत वाहनतळांची सुविधा अपुरी
Prostitution by pretending of Lotus Spa in Nagpur
नागपुरात ‘लोटस स्पा’च्या आड देहव्यापार…