scorecardresearch

Premium

मोखाडा : एकतर्फी प्रेमातून कोयत्याने गळा चिरून तरुणीची हत्या

दुपारी साडेबारा वाजल्याच्या सुमारास जेवणासाठी आश्रमशाळेत जात असताना तरुणीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने कोयत्याचा धाक दाखवून मानेवर वार केला.

murder of a young girl Mokhada
पालघर : कोयताने गळा चिरून तरुणीची हत्या, मोखाडा येथील दुर्दैवी घटना (प्रातिनिधिक छायाचित्र)

पालघर : मोखाडा येथे महाविद्यालयातून आश्रम शाळेत जेवणाच्या सुट्टी दरम्यान येत असताना १८ वर्षीय अर्चना लक्ष्मण उदार या तरुणीची तिच्या प्रियकराने कोयत्याने गळा चिरून निर्घृण हत्या केली.

हेही वाचा – पालघर जिल्ह्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणूकींची रणधुमाळी सुरू, ५ नोव्हेंबरला मतदान तर सहा नोव्हेंबरला निकाल

nagpur crime, nagpur boyfriend runs car over his girlfriend
नागपूर : कारागृहातून सुटताच प्रियकराने थेट प्रेयसीच्या अंगावर घातली कार
kolhapur, two murder in kolhapur, kolhapur crime news,
कोल्हापूरात खूनाचे सत्र; कुडित्रेत मद्यपीकडून वृद्धाचा खून, इचलकरंजीत तरुणाची निर्घृण हत्या
Malad
माणुसकीला काळिमा! मुंबईत गटारात फेकलेल्या गोणीत सापडलं नवजात बालक, प्राणीप्रेमीच्या ‘या’ कृतीमुळे मिळालं जीवदान
boyfriend suicide nagpur
प्रेयसीवर जीवापाड प्रेम, साता जन्माच्या आणाभाका; पण अर्ध्यावरती डाव मोडला अन् प्रियकराने…

हेही वाचा – पालघर : नंडोरे येथे विजेचा धक्का लागून दोन तरुणांचा मृत्यू, रानडुक्कर पकडण्यासाठी रचला होता विद्युत सापळा

रयत शिक्षण संस्थेच्या गभालपाडा अनुदानित आश्रम शाळेत शिकणारी ही विद्यार्थिनी शिक्षणासाठी लगतच्या महाविद्यालयाच्या इमारतीत येत असे. दुपारी साडेबारा वाजल्याच्या सुमारास जेवणासाठी आश्रमशाळेत जात असताना तिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने कोयत्याचा धाक दाखवून मानेवर वार केला. तिच्याबरोबरच्या मैत्रिणी घाबरून पळून गेल्या. या हल्ल्यात अर्चनाचा जागीच मृत्यू झाला. हल्ला करणारा २० वर्षीय तरुण हा परिसरातीलच असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Murder of a young girl in mokhada ssb

First published on: 06-10-2023 at 15:48 IST

आजचा ई-पेपर : पालघर

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×