खांब स्थलांतरित करण्याचा सूचना

पालघर : पालघरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु  या कामामध्ये  विद्युत आणि इंटरनेट खांबांचा अडथळा निर्माण झाला आहे. 

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Major fire at Marathwada University premises
विद्यापीठ परिसरात आग; अग्निशमन विभागाचे अधिकारी, जवान घटनास्थळी दाखल
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

जिल्हाधिकारी कार्यालय सिडकोने उभारलेल्या नवनगर येथील संकुलात स्थलांतरित केल्यानंतर पालघर-बोईसर रस्त्यावरील रहदारी वाढली आहे.  छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हा मुख्यालय संकुलपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूर केले असून या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

पावसाळा संपल्यानंतर हे काम प्रत्यक्ष सुरू करायचा प्रयत्न केला असता रुंदीकरण होणाऱ्या भागामध्ये विद्युत खांब तसेच महानेटचे इंटरनेट खांब असल्याचे दिसून आले. रस्ता रुंदीकरणात होणाऱ्या अडथळ्यासंदर्भात या दोन्ही संस्थांना  सार्वजनिक बांधकाम विभागाकडून  सूचना करताना  रस्त्याच्या मर्यादेपलीकडे खांब स्थलांतरित करण्यास सांगण्यात आले आहे.  खांबांचे स्थलांतर झाल्यानंतरच रस्ता रुंदीकरणाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल, असे सांगण्यात आले.

दरम्यान या रस्त्याच्या दुतर्फा मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण झाले असून  रुंदीकरणाच्या वेळप्रसंगी अतिक्रमण काढण्यात येईल याची भूमिका सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली आहे. अरुंद रस्ता, वाढलेले अतिक्रमण तसेच वाढलेली वाहनांची वर्दळ यामुळे या  रस्त्यावर वाहन चालवणे धोकादायक झाले आहे.