पालघर : केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अर्थात पीएम किसान योजनेच्या पोर्टलवरील प्रलंबित माहिती दुरुस्तीचे काम करण्यासाठी २५ मार्च रोजी तालुकास्तरीय शिबीर आयोजित करण्यात आले आहे. इच्छुकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

   पीएम किसान योजनेमधील त्रुटी दूर करण्यासाठी कृषी आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार २५ मार्चला गावपातळीवर पीएम किसान योजनेतील माहिती दुरुस्ती शिबिराचे आयोजन करण्यासंदर्भात संबंधित तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांना कळविण्यात आले होते.

  या शिबिरामध्ये पीएम किसान पोर्टलवरील माहिती दुरुस्तीसाठी नागरिकांना सहकार्य करण्यात येणार आहे. त्यासाठी लाभार्थ्यांनी सोबत सातबारा उतारा, आधार कार्ड, बँकेचे पासबुक व इतर आवश्यक कागदपत्रे घेऊन संबंधित तलाठी, ग्रामसेवक वा कृषी साहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शासकीय यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे. जास्तीतजास्त नागरिकांना योजनेचा लाभ घेता यावा, असा शासनाचा प्रयत्न आहे.